Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे आमदार घटले, विरोधी पक्षनेता कोण होणार? पटोलेंनी दिलं थेट उत्तर
Nana Patole : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळेल असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले आहे.
पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी मंत्रिमंडळात आहे. नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. आता राष्ट्रवादीकडे 44 आमदार तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. आमचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आम्हालाच विरोधी पक्षनेते पद मिळेल असा दावा पटोले यांनी केला. विधिमंडळाचे अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होत आहे. सध्या काँग्रसचे आमदार संख्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विधिमंडळात काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता असेल असे पटोले यांनी सांगितले.
राज्य मंत्रिपदाचा विस्ताराचा घोळ सुरुच; मंत्रिपदाच्या आशेने आमदार लंके देवदर्शनाला?
पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता मात्र त्यांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. भाजपला लोकशाहीच मान्य नाही. आता राष्ट्रवादीने बिनखात्याचे मंत्री आहेत. जनता उपाशी आणि राज्य सरकार तुपाशी अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
लोकसभेच्या 21 जागांचे टार्गेट
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यातील 21 लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे टार्गेट आम्हाला दिले आहे. आता आम्ही प्रयत्न करून या टार्गेटपेक्षा जास्त जागा जिंकून आणू, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांचे बंड घडले. या बंडामुळे सगळीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत कशा पद्धतीने जागा वाटप होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.