शरद पवारांची ‘ती’ यादी माझ्याकडं, योग्य वेळी बाहेर काढणार; खोतांनी दिला इशारा

शरद पवारांची ‘ती’ यादी माझ्याकडं, योग्य वेळी बाहेर काढणार; खोतांनी दिला इशारा

Sadabhau Khot criticized Sharad Pawar : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर खोत यांच्यावर टीकेची झोड उठली. आज खोत यांनी पुन्हा पवार यांच्यावर घणाघाती टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. खोत म्हणाले, शरद पवारांचा सगळा इतिहास पाहिला तर सगळ्यांच्या घरात भांडणं लावली. त्यांनी राजीव गांधी यांनाही फसवलं. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीने गावगाडा उद्धवस्त केला. संस्था कशा दाबल्या, आणखी काय काय ताब्यात घेतलं याची यादीच माझ्याकडे आहे ती योग्यवेळी मी जाहीर करील, असे आव्हानच खोत यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास गढूळ होण्यास कधीपासून सुरुवात झाली याचा जर इतिहास मांडला तर तो खूप मोठा आहे. 1978 मध्ये वेगवेगळ्या पक्षांना बरोबर घेत वसंतदादांचं सरकार पाडलं हा एक वेगळा इतिहास आहे. वसंतदादांनी अनेक चांगले निर्णय राज्याच्या विकासासाठी घेतले तरीही त्यांचं सरकार घालवलं. हा सगळा इतिहास पवार साहेबांचा पाहिला तर सगळ्यांच्या घरात भांडणं लावली.

जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का; बालेकिल्ल्याला अजितदादांचे खिंडार

त्यांनी राजीव गांधींनाही फसवलं. एस. काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले पुन्हा सोनिया गांधींच्या विदेशी असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुका झाल्यानंतर मात्र पुन्हा त्यांच्याबरोबर युती केली. चव्हाण साहेबांना काँग्रेसमध्ये पाठवले आपण मात्र मागेच राहिले हा फार मोठा इतिहास आहे.

राज्यातील सगळ्या चळवळी पवार साहेबांनी मोडून काढल्या. पक्ष मोडले. त्याची मोठी यादी आहे. शेकाप मोडला, कम्युनिस्ट पक्ष मोडून काढला. जनता पक्ष मोडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाच शिवसेनाही मोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातले आमदार आपल्याकडे घेतले. शरद पवारांचा राजकारणातील उदय आणि जातीपातींचा उगम हा एकाच वेळी झाला. तर सहकार चळवळीचा अस्त सुद्धा ते राजकारणात आल्यानंतरच होण्यास सुरुवात झाली असे म्हणता येईल, अशी घणाघाती टीका खोत यांनी केली.

गावगाड्यातील शेतकरी गुलाम केला

गावातील सगळी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात होती. त्यामुळे काय झालं तर गावगाड्यातला शेतकरी त्यांचा गुलाम बनला. शेतकरी साखर कारखानदारांविरोधात बोलला तर पोलीस त्याला घरात येऊन मारहाण करत होते. रयत शिक्षण संस्था सुद्धा यांनी ताब्यात घेतली. वेगवेगळ्या संस्था यांच्याच ताब्यात घेतल्या.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

फडणवीस-महाजनांना जेलमध्ये टाकण्यासाठी कारस्थानं

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात रोजच मोर्चे निघत होते. मग काँग्रेसचे सरकार असताना इतके प्रश्न का प्रलंबित ठेवले. त्या काळात फडणवीस यांची जात काढली. का तर आमच्या सुभेदाऱ्या नष्ट होऊ नयेत यासाठी. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना आत टाकण्यासाठी किती कारस्थानं केली हे दिसत नाही.

पवार साहेबांनी काटेकुटेच पेरले

पवार साहेबांनी कधी पोटाचं पेरलंच नाही. काटेकुटेच पेरले. कुठं बोरी लावल्या, कुठे बाभळी लावल्या. सगळी काटेकुटेच पेरली आमचं पाय रक्तबंबाळ झाले. पण आम्ही त्या जखमा बऱ्या केल्या. पण, आता त्याच बाभळीच्या वनात त्यांनाच चालायला लागत आहे त्याला काय करणार. महाराष्ट्र पाहतोय सगळं. तु्म्हाला आता कळ सोसवत नाही. म्हणजे तुम्ही जे काही पेरलंय तेच आज उगवलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube