राज्यात मुख्यमंत्री नव्हे मख्खमंत्री, त्यांचे काम 40 खोकेबाज आमदारांना..! राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut News : या राज्याला मुख्यमंत्री नाहीतच मख्खमंत्री आहेत. सगळी सूत्रे उपमुख्यमंत्र्याकडे आहेत. मुख्यमंत्री आणि मख्खमंत्री यात मोठा फरक आहे. मुख्यमंत्री फक्त चाळीस खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवत आहेत बाकी त्यांचे काहीच काम नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
वाचा : Sanjay Raut : राऊतांकडून आदित्य ठाकरेंची थेट ऑस्करशी तुलना
ते म्हणाले, की राज्यात मुख्यमंत्रीच नाहीत. सगळी सूत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्री फक्त चाळीस खोकेबाज आमदारांना सांभाळण्याचे काम करत आहेत.
Gopichand Padalkar : संजय राऊत हा वेडा झालेला माणूस, पडळकरांची टीका
राज्यात सरकारचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. त्यामुळे नुसताच गदारोळ सुरू आहे. लाल वादळ येऊन ठेपलं आहे. किती काळ त्यांना रोखणार आहात. इथे अराजकाची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वणवा पेटेल हे त्यांना माहित आहे का, असा सवाल राऊत यांनी केला.
ते सध्या दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य कारभार करत आहेत. हे लोक राज्य खतम करायला निघाले आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. महाविकास आघाडीने ठरवले आहे की त्याविरोधात आवाज उठवणार आहे. महाविकास आघाडीच्या एकत्र सभा आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वतंत्र सभाही होतील.