मस्ती आली का…? मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना विधानसभेला पाडणार; जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुडेंना इशारा
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : बीड लोकसभा मतदारसंघात बंजरंग सोनवणेंनी (Banjarang Sonwane) पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. त्यामुळं सध्या तिथे मराठा आणि ओबीसींध्ये तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभमीवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी इशारा दिला. मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पाडणार, असा इशारा जरांगेंनी दिला.
मंत्रिपदाची ऑफर होती पण, राष्ट्रवादीनंच नाकारली; फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले, बीड, माजलगाव, केज, गेवराई येथे आमच्या लोकांना बेदम मारहाण झाली. महाजनवाडी बीड तालुक्यातील लोकांना तलवारीने मारण्यात आले. त्यांच्या नेत्याचे काम आहे, त्यांच्या जातीला शांततेचं आवाहन करण्याचे. जरांगे पाटील शांततेचे आवाहन करत आहेत, तुम्ही का करत नाही. ते मजा पाहतात, परदेशात जाऊन झोपतात आणि इकडे धिंगाणा लावून दिला.
Modi Cabinet : प्रतापराव जाधव, रक्षा खडसे… नरेंद्र मोदींसोबत कोणते नेते घेणार शपथ? पाहा यादी
जरांगे म्हणाले, मी कुणाला पाडा म्हटलं का? मी कुणाला निवडून आणलं म्हटलं का? त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काय घोषणा झाल्या? मस्ती आहे का…? मी काय केलं होतं ? मी तिला (पंकजा मुंडे) पाडा म्हटलं का? तरीही मी माझ्या समाजाला आवाहन केलं. गृहमंत्र्यांनी आणि बीडच्या एसपी साहेंबांनी तातडीने लक्ष घालावं. शहाने असाल तर त्यांना आवर घाला. फारच अन्याय होत असेल तर आम्ही शांत कसं राहायंच, असा सवालही जरांगेंनी केला.
यावेळी जरांगेंनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता इशारा देताना म्हटले की, खरंतर जय-पराजय कुणाचा तरी असतोच. मराठ्यांनीच पाडलंय की काय? असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या मागे लावायचे. त्याने काही होत नसतं. मी जाहीरपणे सांगितलं की, ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील, त्या जातीचा नेता पाडणार आम्ही. वेळ प्रसंगी तिथं उमेदवार देणार नहाी, पण त्याला पाडणार, असा इशारा जरागेंनी दिला.