बोंडे, माझ्या नादी लागू नको, फडणवीसांचं करिअर संपेल; मनोज जरांगेंचा इशारा

बोंडे, माझ्या नादी लागू नको, फडणवीसांचं करिअर संपेल; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil : भाजप खासदार अनिल बोंडेंनी (Anil Bonde) श्याम मानव आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. श्याम मानव आणि जरांगे-पाटील यांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अंगावर कुत्रे सोडलेत, असं वक्तव्य बोडेंनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता मनोज जरांगेंनी भाष्य केलं. अनिल बोंडेंनी माझ्या नादू लागू नये, फडणवीसांचा राजकीय करिअर संपेल, असं वक्तव्य त्यांनी केलं.

बांगलादेशचा ताबा लष्कराच्या हाती , पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देश सोडला 

मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बोडेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता जरांगे म्हणाले,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत नाहीये. त्याचं राजकीय करिअर संपूर्ण जाईल. बोंडेंनी माझ्या नादी लागू नये. हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस करत आहेत. यामुळं त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल, असा इशारा जरांगेंनी दिला.

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; मंत्री विखेंचा हल्लाबोल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात. पण, त्यांना आरक्षण देताना कुणीही अडवू नये. फडणवीस यांनी आमच्या जवळचे लोक फोडले. त्यांनी त्यांना माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यास उद्युक्त केलं, असा आरोपही जरांगेंनी केला.

फडणवीसांना मोजत नाही
यावेळी त्यांना नारायण राणेंवरही भाष्य केलं. राणेसाहेब, तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलत आहात. तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने बोलावं. राणे दादा मी तुम्हाला आव्हान दिलेले नाही, तुम्ही मला धमकी देऊ नका. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा सुपारी घेतली आहे. पण मी देवेंद्र फडणवीसला मोजत नाही. कारण, मराठा समाजाने भलेभले चांगले पायाखाली चिरडले, असं जरांगे म्हणाले.

मी नारायण राणेंवर टीका केलेली नाही. त्यांनी आरक्षण दिले होते, म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो. पण, तुम्हाला शेवटचं सांगतो, माझ्या नादी लागू नका, जी वळवळीची भाषा मला शिकवू नका. तुम्हाला पश्चाताप होईल. शहाणे व्हा, मला धमकी देण्याची काही गरज नाही. मी गोरगरिबांसाठी काम करतो. तुम्ही फडणवीसला मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका, असंही जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube