मंत्र्यांच्या खात्यांचं विभाजन का झालं? भाजपाच्या मंत्र्यानं क्लिअरच केलं..

मंत्र्यांच्या खात्यांचं विभाजन का झालं? भाजपाच्या मंत्र्यानं क्लिअरच केलं..

Girish Mahajan on Maharashtra Cabinet : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप शनिवारी जाहीर करण्यात आलं. यानंतर आता मंत्री आपापल्या मतदारसंघात परतू लागले आहेत. या मंत्रिमंडळात मंत्रिपद देताना अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. काही मंत्र्यांची जुनी खाती काढून घेण्यात आली. त्याजागी त्यांना कमी महत्वाची खाती मिळाली. मंत्रि‍पदाचा अनुभव नसणाऱ्या नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली. या सर्व घडामोडींमुळे नाराजी सुरू झाल्याची चर्चा आहे. यावर आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाष्य केलं आहे.

महायुतीत तिन्ही पक्ष होते त्यामुळे खातेवाटपला निश्चितच उशीर झाला आहे. पण आता काल खातेवाटप झालं असून मंत्र्यांना खाती मिळाली आहेत. दोन दिवसांत मंत्री खात्याचा कार्यभार स्वीकारून कामाला सुरुवात करतील.

..म्हणून एक-एक खातं देण्याची वेळ फडणवीसांवर आली, अजितदादांचा खुलासा

नवीन मंत्र्यांना खाती देण्यात आली आहेत. तर जलसंपदा खातं तुम्हाला आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना जोडून देण्यात आलं आहे असे पत्रकारांनी विचारलं असता महाजन म्हणाले, ही गोष्ट चांगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचेही पाण्यावर जास्त लक्ष आहे. शेतीला पाणी मिळालं पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. त्यामुळे नदीजोड प्रकल्पांना आता प्राधान्य देण्यात आलं आहे. या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात कामं सुरू होणार आहेत. वर्कलोडही राहणार आहे. त्यामुळे कामाचं विभाजन करण्यात आलं आहे. त्यातच आता मंत्री जास्त झालेत आणि खाते कमी आहेत त्यामुळे थोडी फार विभागणी होईल, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, महायुतीच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं. त्यामुळे या मंत्र्यांना खातेवाटप करता आलं नाही. मात्र काल अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आलं. या खातेवाटपाचं वैशिष्ट्य म्हटलं तर ज्यांना मंत्रि‍पदाचा फारसा अनुभव नाही अशा आमदारांना मोठी खाती दिली आहेत. काही माजी मंत्र्यांची जुनीच खाती त्यांच्याकडे कायम ठेवली आहेत. तर काही माजी मंत्र्यांची राजकीय ताकद कमी करण्याचाही प्रयत्न झाला आहे.

चारही मंत्र्यांना ‘वजनदार’ खाती; महायुतीमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा आवाज

follow us
  • fb
  • instagram
  • youtube