हैद्राबादचा खुराट बोकडा आला अन् बडबड करुन गेला; संग्राम जगतापांचं ओवैसींना खोचक प्रत्युत्तर
हैद्राबादचं खुराट बोकड अन् छत्रपती संभाजीगरचं बोकड आलं अन् बडबड करुन गेलं, या शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी एमआयएम नेत्यांवर टीका केलीयं.

Mla Sangram Jagtap On Asaduddin Owaisi : हैद्राबादचं खुराट बोकड अन् छत्रपती संभाजीगरचं बोकड अहिल्यानगरमध्ये आलं आणि काहीतरी बडबड करुन गेलं, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Mla Sangram Jagtap) यांनी एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी, (Asaduddin Owaisi) माजी खासदार इम्तियाज जलील यांना खोचक प्रत्युत्तर दिलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानजनक पत्रके भिरकावल्याप्रकरणी आज अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते.
पुढे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, एमआयएमची बोकडं त्या दिवशी अहिल्यानगरमध्ये आली होती. एक हैद्राबादचं खुराड बोकड आणि दुसरं छत्रपती संभाजीनगरवरुन बोकड आलं. ते बोकड आली अन् काहीतरी बडबड करुन गेली. आता त्यांची भाषा बदलली आहे. याआधी पंधऱा मिनिट के लिए पोलिस हटाव फिर देखेंगे क्या करते है…असं ते म्हणायचे पण आता पंधरा नाही तू पाचच मिनिट सांग, या शब्दांत संग्राम जगताप यांनी एमआयएमच्या नेत्यांवर सडकून टीका केलीयं.
अहिल्यानगरमध्ये आलेल्या बोकडांनी फरीद खानचा निषेध केला का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमान करणारे पत्रके फेकणाऱ्या फरीद खानची काही दिवसांपूर्वी एका बौद्ध बांधवाशी बाचाबाची झाली. याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केलं. पोलिस प्रशासनाने तत्काळ या आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर समजलं की हा सुद्धा डॉबरमॅन आहे. ह्या बोकडांची आता जिरली, या शब्दांत आमदार जगताप यांनी टीका केलीयं.
टेक इंडस्ट्रीत मोठा धक्का! डिसेंबरपर्यंत 50 हजारांहून जास्त IT कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता, अहवाल समोर…
‘खरेदी अपनो से करो’…सुरुवात त्यांनीच केली…
आपण बोललो की, दिवाळीत हिंदूंकडून खरेदी करणे. ईदच्यावेळी ह्या लोकांनी अशी पत्रके वाटली, त्याच्यावर लिहिलंय की, ईद की खरेदी अपनो से करे अपना खायेगा जकात निकलेगा. आपली जकात बंद झाली पण यांची अजून सुरु आहे. अनेक वर्षांपासून हे सुरु आहे. आपण जाऊ द्या म्हणायचो. जबाबदार लोकांना आम्ही भेटलो त्यांना सांगितलं असं काही करु नका पण ते थांबले नाहीत. मग आपणही सांगितलं की, आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा, सुरुवात त्या लोकांनी केली असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलंय.
एक अतुलनीय आठवण! विशेष कार्यक्रमातून अभिनेते अतुल परचुरेंच्या आठवणींच्या स्मृतीगंधाला उजाळा
आता सगळेच तयारीत आहेत…
हिंदुधर्मीयांचे सणवार आले की काहीतरी खुसपाट काढायचं. तुमच्या देवाचं नाव असेल मान्य त्याखालचा मजकूर आव्हान देणारा होता. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नवरात्र उत्सवात झाला. प्रशासनाला आम्ही सांगितलं पण ते बोर्ड काढायची हिम्मत झाली नाही. आजही ते बोर्ड तसेच आहेत फक्त काळ्या चिकटपट्ट्या लावून ते झाकून टाकलं, जर आता काही झालं तर सगळेच तयारीत आहेत, आता सगळ्यांच ठरलंय की तयारीत राहायचं, या शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी इशाराही दिलायं.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये एमआयएम नेत्यांची सभा पार पडली. या सभेतून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यानंतर आज शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चातून आमदार संग्राम जगताप यांनी एमआयएमच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.