मोदींनी काँग्रेसला डिवचले, काढली Sharad Pawar यांची ‘ती’ आठवण…

मोदींनी काँग्रेसला डिवचले, काढली Sharad Pawar यांची ‘ती’ आठवण…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी आज राज्यसभेत ( Rajyasabha ) बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलत होते. त्यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar )  यांचा एका किस्सा सांगितला. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांचे सरकार तत्कालीन केंद्रातील काँग्रेस सरकारने पाडल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मोदी म्हणाले, सभापतीजी सभागृहामध्ये एक सदस्य आहेत. ज्यांना मी आदरणीय मानतो. ते म्हणजे शरद पवार होय. 1980 साली शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे 35 किंवा 45 असेल. त्यावेळी एक नौजवान मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी चालला होता. पण त्यावेळी त्यांचे सरकार पाडून टाकण्यात आले, असा किस्सा मोदींनी आज सभागृहात सांगितला.

शरद पवार यांनी 1978 साली काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचे सरकार स्थापन केले होते. 1980 साली इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांनी हे सरकार बरखास्त करुन टाकले. ही आठवण मोदींनी आज सभागृहामध्ये सांगितली.

दरम्यान राज्यसभेत पंतप्रधान मोदी बोलत असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर या गदारोळात देखील मोदींनी विरोधकांवर विविध मुद्द्यांवरुन निशाणा साधला. नेहरु-गांधी कुटूंब, कलम 356, महागाई-बेरोजगारी इ. विषयांवरुन त्यांनी विरोधकांना फैलावर घेतले. तर विरोधकांनी मोदी व अदानी यांच्या संबंधावरुन जोरदार घोषणाबाजी केली. मोदींनी अदानी यांच्या प्रश्नावर उत्तर द्यावे, असे विरोधकांने म्हटले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube