आमच्यात टॅलेंट म्हणूनच आमचे नेते हवेत; पक्षांतराच्या वावड्यांवर सुप्रिया सुळेंचा घणाघात

आमच्यात टॅलेंट म्हणूनच आमचे नेते हवेत; पक्षांतराच्या वावड्यांवर सुप्रिया सुळेंचा घणाघात

Supriya Sule News : आमच्यात टॅलेंट म्हणूनच आमचे नेते हवे असल्याचं म्हणत पक्षांतराच्या वावड्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर घणाघात केला आहे. दरम्यान, राज्यात सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते भाजपात जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं तर दुसरीकडे भाजप खासदार सुजय विखेंनीही बाळासाहेब थोरात भाजपात येणार असल्याचा दावा केलाय. तर चंद्रशेखर बावनकुळेंनीही जयंत पाटील संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. त्यावरच बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर घणाघात केला आहे.

गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याबद्दल अनेक चर्चा सुरु असतात. सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, जयंत पाटलांसह इतर अनेक नेत्यांबद्ल चर्चा सुरु असते. भाजपकडे 200 आमदार आणि 300 खासदार एवढी मोठी ताकद तरीही त्यांना आमचे लोकं नेते लागत आहेत, याचा अर्थ आमच्या नेत्यांमध्ये काहीतरी टॅलेंट आहे ना म्हणूनच तर आम्ही त्यांना हवे आहेत. आम्ही काही छोटे पक्ष राहिलो आहोत त्या पक्षातील नेत्यांची त्यांना गरज भासत आहे म्हणजे काहीतरी दम आहे ना? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

जरांगेंवर गुन्हा दाखल करा; खानदान मिटवू टाकण्याची भाषा शोभते का? तायवाडेंचा हल्लाबोल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांवर ते आपल्या संपर्कात नसल्याचे सांगितलं मात्र यावेळी त्यांनी आमच्या सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असल्याचे सुतोवाच देखील केलं. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. जर माझ्या नावाच्या अशा प्रकारे चर्चा होत असेल तर चांगला आहे सर्वांनीच प्रसिद्ध द्यावी. कारण थोडी प्रसिद्ध मिळाल्याशिवाय लोकांसमोर जाण्याचा चान्स राहिलेला नाही. असं म्हणत जयंत पाटील यांनी आपल्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर जणू एक प्रकारे उलट फासाचं टाकला आहे.

CM शिदेंच्या भाषणाकडे कोल्हापूरकरांनी फिरवली पाठ, रिकाम्या खुर्च्या पाहून मुख्यमंत्र्यांचा हिरमोड

दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांच्या मनामध्ये सध्या अस्वस्थता आहे. अनेक मोठ्या नेत्यांमध्ये राजकीय अस्वस्थता आहे. प्रत्येकजण आपापल्या परिने योग्यच पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, मला त्यावर अधिक काही बोलायचं नाही पण पुढील 15 दिवस मोठ्या राजकीय घडामोडींचं पाहायला मिळणार असल्याचं भाकीत अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरेंनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube