राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, राजकीय भूकंप होणार; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 21T164357.405

NCP leader Prakash Solnake :  राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक उलटसूलट राजकीय चर्चा रंगल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. यानंतर देखील या राजकीय चर्चा थांबलेल्या नाहीत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार प्रकाश सोळंके यांनी एक सूचक विधान केले आहे.

मी गेल्या 35 वर्षांपासून राजकारणात आहे. त्यामुळे माझ्या राजकीय अभ्यासानूसार राज्यामध्ये राजकीय भूकंप होण्याची स्थिती असल्याचे प्रकाश सोळंकेंनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे, असे होणार तसे होणार.  पण जो करतो तो  कुणाला थांगपत्ता लागू देत नाही. पण  ज्यावेळी जे  व्हायचे आहे ते होणारचं आहे, असे ते म्हणाले आहेत.

संजय राऊत वि. नारायण राणे संघर्ष पेटला, राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल

राजकारणातील घडामोडींचे काय व्हायचे ते होवो. मी  गेल्या 15-20 दिवसांमध्ये मी मुंबईला गेलेलो नाही. माझी कुणासोबत राजकीय चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले आहेत. 35 वर्षाच्या राजकारणानंतर माझा जो अनुभव त्यावरुन मी हे विधान केले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. प्रकाश सोळंके यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

“अजित पवार म्हणजे एक स्वीट डिश, गोड माणूस…” संजय राऊत यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण अस्थिर झाल्याचे बोलले जात आहे. अनेक जण या पक्षातून त्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आता प्रकाश सोळंके यांनी केलेले विधान हे बरेच काही सांगून जात आहे. त्यामुळे आगामी काळात काय होते ते पाहणे महत्वाचे राहणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube