भाजपसोबत जाणार का? नवा पक्ष काढणार का?, भुजबळांनी क्लिअरचं केलं

भाजपसोबत जाणार का? नवा पक्ष काढणार का?, भुजबळांनी क्लिअरचं केलं

Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीची लाट उसळली आहे. या नाराजीचा केंद्रबिंदू ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ठरले आहेत. नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर काल नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातही भुजबळांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीवर अजित पवार गटातील नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. या घडामोडी घडत असतानाच छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. भाजपसोबत जाणार की नवा पक्ष काढणार यावरही त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.

आपण भाजपसोबत जावं असं अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं आहे. मग भाजपमध्ये तुमच्याबाबत सहानुभूती आहे असं वाटतं का असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, मला याबाबत काही कल्पना नाही. कालच्या मेळाव्यात काही जण म्हणाले विरोधी पक्ष पाहा काही जण म्हणाले स्वतंत्र पक्ष काढा. पण भाजपमध्ये जा असं मोठ्या प्रमाणात म्हटलं जात होतं. आता या लोकांच्या भावना आहेत त्यांचे विचार आहेत. मी त्यांना सांगितलं की मी तुमचे विचार जाणून घेतले आहेत. नेते कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करू. पण कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका. शांतता राखा. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन असे छगन भुजबळ म्हणाले.

“अजितदादांची काय चूक, भुजबळांनी सांगावं” राष्ट्रवादीच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

भाजपमधून तुमच्याशी कुणी संपर्क केला आहे का? भाजपमध्ये जाण्यास आपला नकार आहे का? या प्रश्नांचं उत्तर देताना भुजबळ म्हणाले, मी आताच तुम्हाला सांगितलं आहे की मी चर्चा करुनच काय तो निर्णय घेईल. तिकडे दार उघडं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलणं झाल्याचं आपण सांगितलं होतं. यावर भुजबळ म्हणाले, दोन दिवस तर हाऊस बंदच होतं. काल तर ते आले असे सांगितले.

राजकारणात आता नवीन पक्ष काढणं ही काही सोपी गोष्ट नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांनीही माझ्याशी चर्चा केली होती. त्यावेळी मी राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. आमची चर्चाही झाली होती. पण काही गोष्टींमुळं ते राहून गेलं. नंतर पाहू असं मी म्हणालो होतो असे छगन भुजबळ या मुलाखतीत म्हणाले. ओबीसी समाजात जवळपास तीनशे ते चारशे जाती आहेत. या सर्वांना एकत्रित आणणं त्यासाठी किती साधनसामग्री लागेल ही काही सोपी गोष्ट नाही, असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते, त्यांची नाराजी परवडणारी नाही, गिरीश महाजनांचे मोठे विधान

follow us
  • fb
  • instagram
  • youtube