आव्हाडांनी शोधलं नवं प्रकरण! महादेव गित्तेचा दवाखान्यातला व्हिडिओ शेअर; कराडचं कनेक्शन?

आव्हाडांनी शोधलं नवं प्रकरण! महादेव गित्तेचा दवाखान्यातला व्हिडिओ शेअर; कराडचं कनेक्शन?

Jitendra Awhad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या प्रकरणात काही आरोपी गजाआड झाले आहेत. त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तोही सध्या कोठडीत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप होत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवं प्रकरण शोधून काढलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.

कराडचा आणखी एक कारनामा, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न.. ऑडिओ क्लिप व्हायरल

“29 जून 2024 रोजी माहादेव गित्ते याच्यावर वाल्मीक कराड च्या सांगण्यावरून हल्ला झाला जखमी इसमाचा आंबेजोगाई मेडिकल कॅालेज मधे उपचार घेत आसताना दि ०२/०७/२०२४ रोजी महादेव गित्ते याने बनवलेला व्हीडीओ” असे कॅप्शन देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे.

 

व्हिडीओत नेमकं काय?

दोन तीन दिवसांपूर्वी तिघे जण माझ्या घरी आले होते. त्यात बापू आंधळे देखील होता. तू वाल्मिक अण्णाचं काम का करत नाहीस अशी विचारणा त्यांनी माझ्याकडे केली. मी त्यांच्या हातापाया पडून विनंती करून त्यांना तिथून पाठवून दिले. जाता जाता मात्र त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एक त दीड तासाने मला माझ्या शेजाऱ्याचा फोन आला. त्यानं सांगितलं की पंधरा ते वीस जण तुला शोधत आहेत. नंतर मी घरीच थांबलो.

काही जण मला भेटायला आले होते. आम्ही सगळे घरातच बसलो होतो. तेवढ्यात बाहेरून काही जणांनी दगडफेक सुरू केली. गाडी फोडली. फायर केल्यानंतर मी बाहेर आलो. त्यावेळी बापू आंधळेनी माझ्या छातीत बुक्की मारली. मी त्याला जाब विचारला तर त्याने सांगितलं की वाल्मिक बाबुराव कराडने तुला मारून टाकण्यास आम्हाला सांगितलं असं उत्तर त्यांनी मला दिलं असे महादेव गित्ते या व्हिडिओत सांगताना दिसत आहे.

महादेव गित्तेंची पोलिसांत तक्रार

दरम्यान, त्यावेळी महादेव गित्ते यांनी तेव्हा बापू आंधळेवर गंभीर आरोप केले होते. गित्ते यांच्या घरावर बापू आंधळे आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला केला. गाड्यांची तोडफोड केली. काहींनी गोळीबारही केला. यातील तीन गोळ्या लागल्यानंतर महादेव गित्ते जखमी झाले होते. यानंतर गित्ते यांनी पोलिसांत धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पुढे महादेव गित्ते यांनी सांगितल्यानुसार आपल्यावर हल्ला करायला आलेले असताना अंदाधुंद गोळीबार करत असतानाच गोळी लागून बापू आंधळेचा मृत्यू झाला. पोलिसांत जी तक्रार दाखल होती त्यातही 29 जून 2024 रोजी गोळी लागून बापू आंधळेचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं.

29 जून 2024 रोजी आंधळेचा मृत्यू

बापू आंधळे हा अजित पवार गटाचा सरपंच होता. परळीमध्ये त्याच्यावर गोळीबार झाला होता. पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार 29 जून 2024 ला बापू आंधळेचा गोळ्या लागल्यानं मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर, याच प्रकरणात बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर विरोधातच नोंदवलेल्या तक्रारीमध्ये कराडसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube