दुष्काळ, दूधदर, पीकविमा अन् पाणीयोजना.. आमदार तनपुरेंचे सरकारवर ‘चार’ प्रहार

दुष्काळ, दूधदर, पीकविमा अन् पाणीयोजना.. आमदार तनपुरेंचे सरकारवर ‘चार’ प्रहार

Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली.गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात (Maharashtra Winter Session) पावसाचे प्रमाण कमी झाले. यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारने 40 हून अधिक गावांचा समावेश दुष्काळसदृश्य गावांच्या यादीत केला. मात्र नगर जिल्ह्यातील गावांचा सुरुवातीला यामध्ये समावेश नव्हता. दुष्काळाची परिस्थिती असताना नगरचे पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात आले. दुष्काळसदृश्य परिस्थिती निकष पहिले तर कोणताही फायदा महसूली मंडळांना होणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे पहिले तर शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. हा फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) यांनी सरकारवर निशाणा साधला.

पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, कृषिपंपांना वीजबिलात सूट दिली मात्र खरी गरज पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये महत्वाचा आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या वीजबिलात सूट देणे गरजेचे आहे. वीज कनेक्शन बंद केले जाऊ नये मात्र महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो आहे. यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती पाहता यावर काहीतरी ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यावेळी तनपुरे यांनी केली.

पवारांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केलं तर गद्दारी कशी काय? फडणवीसांचा राष्ट्रवादीला सवाल

पिक विम्याच्या नुसत्याच घोषणा 

पिक विम्याबाबत अनेक मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. मात्र खूप कमी लोकांना याचा फायदा मिळाला आहे, अशी खंत यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केली. अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. केवळ सरकारकडून घोषणा केल्या जात असून वास्तविक पाहता शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही, असे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल असे धोरण सरकारने राबवावे, पीकविम्याची अग्रीम रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळावी अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या काळात दूधदर नियंत्रित 

दूध दराबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, आमच्या जिल्ह्यात दूध उत्पादक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र दुधाचे दर काही दिवसांपूर्वी 35 ते 40 रुपयांवर गेलेले दुधाचे दर आता 20 ते 25 रुपयांवर आले आहे. महाविकास आघाडीने दूध खरेदी करून दुधाचे दर नियंत्रित ठेवले होते. मात्र या सरकारच्या काळात दुधाचे दर पडले आहेत. ग्राहक खरेदी करत असलेल्या दुधाचे दर काही कमी झाले नाही. यामुळे सरकारने दुधाच्या दरबाबाबत काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

शरद पवार की अजित पवार? प्राजक्त तनपुरेंनी स्पष्ट केली भूमिका

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube