वक्फ बोर्ड निधी रद्द! तोंडाजवळ चॉकलेट द्यायचं अन्..,; जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांवर रोख…
Jitendra Awhad News : एखाद्या मुलाच्या तोंडाजवळ चॉकलेज द्यायचं अन् खेचून घ्यायचं, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर टीका केलीयं. दरम्यान, वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, महायुती सरकार स्थापन करण्याच्या आधीच हा निर्णय मागे घेण्यात आला असल्याचं समजंतय. त्यावरुन विरोधकांकडून महायुती सरकारवर सडकून टीका केली जात आहे.
‘आर्यन्स सन्मान’ ची नामांकने घोषित, पुण्यात पुरस्कारांची घोषणा; 13 लाख रुपयांचे पुरस्कार देणार
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, एखाद्या मुलाच्या तोंडाजवळ चॉकलेट द्यायंच अन् खेचून घ्यायचं, एखाद्याला देता अन् काढून काढून घेता कशाला? एखाद्याचा अपमान करता तुम्ही हे हास्यास्पद आहे, हे सरकार 12 कोटी जनतेचं आहे. राज्याचं अर्थ खातं अजित पवारांकडे आहे. त्यांनी वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये द्यावेत, अशी बोचरी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलीयं.
‘यांच्या खेळात राज्याचा खोळंबा’; सत्ता स्थापनेच्या गोंधळावरून रोहित पवारांचे टीकास्त्र
दरम्यान, महायुती सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला होता. महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे यासाठीचा शासन निर्णयही जारी करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाला बळकट करण्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 20.00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार 2024-25 वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली होती. त्यामधून 2 कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित करण्यात येणार होते. तर, आता 10 कोटी रुपये अदा करण्यात येणार होते. वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा निधी देण्यात येणार होता.