विधानसभेलाही लोकसभेचाच पॅटर्न; दादांच्या आमदारांविरोधात शरद पवारांच्या तरुणांची फौज…
Sharad Pawar Group : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं वेध लागलंय. लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यामुळे शरद पवारांना 10 पैकी 8 जागा मिळाल्या तर अजितदादांना अवघी एकच जागा मिळाली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीलाही शरद पवारांकडून तरुणांचीच फौजच मैदानात उतरविण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार यांनी आत्तापर्यंत दोन तरुणांचीही घोषणा करम्या आलीयं. त्यापैकी अहमदनगरमधील अकोल्यात अमित भांगरे तर सांगलीतील तासगावात रोहित पाटलांना संधी देण्यात येणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाकडून 20 तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आलीयं.
विधानसभेच्या तोंडावर महायुतीचं ‘उद्योग’ धोरण; मराठवाड्यात ‘Toyota’ कंपनी करणार मोठी गुंतवणूक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजित पवार यांनी बंडखोरी करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करीत सत्तेत सामिल झाले. अजित पवार यांच्यासह इतर समर्थक आमदारही सत्तेत सहभागी झाले होते. एवढंच नाही तर राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचा दावाही अजित पवारांच्या गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे आता शरद पवार यांनीही दादा गटाविरोधात दंड थोपटले असून 20 विधानसभा मतदारसंघात तरुणांना संधी देण्यात येणार आहे. या 20 मतदारसंघामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघ, हसन मुश्रीफ यांचा कागल, तर दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव आणि आदिती तटकरे यांचा श्रीवर्धन मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. तरुणांना संधी देण्यासाठी सध्या शरद पवार गटाकडून चाचपणी सुरु आहे.
जिद्दीला सलाम! सात महिन्यांची गरोदर असताना ऑलिम्पिकमध्ये सहभागी; जगभरातून कौतुकाचा वर्षाव
राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतरही शरद पवार यांनी राज्यभर दौरा करत पुन्हा संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं होतं. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जाहीर सभांचा झंझावात सुरुच होता. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने 10 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले. या 10 मतदारसंघापैकी 8 मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. या मतदारसंघात अनेक नव्या चेहऱ्यांना शरद पवार यांनी संधी दिल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे आता लोकसभेसारखाच पॅटर्न विधानसभेलाही वापरणार असल्याची शरद पवार यांची रणनीती असल्याचं बोललं जात आहे.
‘नाहीतर शरद पवारांना त्रास होईल’, विद्या चव्हाणांच्या गंभीर आरोपांवर चित्रा वाघांचा प्रत्युत्तर
माहितीनूसार शरद पवार गटाकडून खालीलपैकी 20 मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये अहेरी, आष्टी, दिंडोरी , गेवराई, श्रीवर्धन, हडपसर, पुसद, बारामती, अळमनेर, उदगीर (अ.जा.), इंदापूर, अणुशक्ती नगर,
परळी, कागल, आंबेगाव, मावळ, सिन्नर, तुमसर, फलटण (अ.जा), वडगाव शेरी, या मतदारसंघाचा समावेश आहे.