Maharashtra Political : ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून’, मुख्यमंत्री शिंदे यांचा पवारांना टोला

  • Written By: Published:
Maharashtra Political : ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून’, मुख्यमंत्री शिंदे यांचा पवारांना टोला

मुंबई : विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने (NCP) सत्ताधारी रिओ यांच्या पार्टीला पाठिंबा दिला. मात्र, रिओ यांची पार्टी आणि भाजप युती सध्या चर्चेचा विषय झाला. यावरुन शिंदे गटाच्या शिवसेनेने (Shiv Sena) राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला. यावरुन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सभागृहामध्ये यावर आक्षेप घेतला.

https://www.youtube.com/watch?v=N_-NCOncia8

यावर गुलाबराव पाटील म्हणाले गेल्या काही दिवसापासून देशात बदलाचे वारे वाहत आहेत. नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप पुरस्कृत सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये ५० खोके विषय झाला आहे का ? असा प्रश्न विचारला. ‘५० खोके, नागालँड ओके झालंय का ?” गुलाबराव पाटील यांनी आरोप केला. सोईचे राजकारण करु नका, असे सांगत ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून’, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी टोला लगावला.

नागालँड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालँड येथे ही 50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. 50 खोके एकदम ओके नागालॅंड ओके आता म्हणा, असे म्हणाले.

गुलाबराव पाटील म्हणाले, ‘५० खोके, नागालँड ओके’, अजित पवार भडकले, मुख्यमंत्रीही बोलले

गुलाबराव पाटील यांनी नागालँड ओके झालंय का? असा प्रश्न विचारताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) भडकले. अजित पवार म्हणाले की आज सरकार, सर्व यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी चौकशी करावी. त्याऐवजी असे आरोप करणे चुकीचे आहे. ईशान्येतील परिस्थिती वेगळी आहे. त्यानुसार निर्णय घेतले जातात. त्यावर बोलून इथे काहीच फायदा नाही. असं उत्तर अजित पवार यांनी दिल.

त्यावर छगन भुजबळ यांनीही गुलाबराव पाटील सभागृहात चुकीची माहिती देत आहेत. अशी टीका केली. ते म्हणले की नागालँडमध्ये आम्ही भाजपला नाही तर तेथील स्थानिक पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे “बेगाना शादी मे अब्दुला दिवाना” अशी परिस्थिती भाजपची आहे.

नागालँडचा विषय आज सभागृहात नव्हता पण तुम्ही रोज येऊन आम्हाला ५० खोके म्हणता. त्यामुळे नागालँड मध्येही असं काही झालंय का ? एवढाच प्रश्न आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले. छगन भुजबळ यांना उत्तर देताना ते म्हणाले कीं तुम्ही सरकारला पाठिंबा नाही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला, हे सोयीचे राजकारण तुम्ही करता असं मुख्यमंत्री म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube