नागपूर : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी श्रध्दा वालकर प्रकरणाची विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करणारी लक्षवेधी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशिष शेलार यांची मागणी मान्य करीत विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्याची घोषणा केली. ‘कोणत्याही जाती-धर्माची मुलगी असली तरी सरकारने काळजी केली पाहिजे. श्रध्दा वालकर प्रकरणात […]
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ध्वनी यंत्रणा बंद असल्याने जवळपास 55 मिनिटं सभागृह बंद राहिल्याचे दिसून आले. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, त्यांना वाट मोकळी करण्यासाठी कामकाज होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक कारणामुळे सभागृह बंद पडल्याने अधिकाऱ्यांची वर्गाची चांगलीच धावपळ उडाली. तर अशा पद्धतीने सभागृह बंद राहणे ही बाब संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत […]
नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 83 कोटी रुपयांचा भूखंड 2 कोटी रुपयांना दिल्याचा मुद्दा आता विरोधकांनी अधिवेशनातच उपस्थित केलाय. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेरल्यानंतर त्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. पण विरोधकांनी सभापती यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळामुळे सभागृह काही वेळासाठी तहकूब करण्याची वेळ आली. भूखंडाचा मुद्दा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांचे पूत्र प्रतापसिंह यांचा पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केलाय. त्यामुळे पाचपुते यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बबनराव पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीतील चाणक्य म्हणून त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते ओळखले जात होते. दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते […]
जळगाव : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील ऊर्फ चंद्रकांत पाटील यांची गड आला पण सिंह गेला, अशीच अवस्था झाली आहे. कारण त्यांची कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचाय सदस्य म्हणून विजयी झाल्या मात्र, त्यांचे संपूर्ण पॅनेल पराभूत झाले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचा हा तालुका आहे. त्यामुळे संपूर्ण […]
अहमदनगर : आज झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणीत आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. कांगोणी, भेंडे खुर्द व वडाळ्यात सत्तांतर झाले आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात असलेल्या कांगोणीत गडाख गटाचा सरपंच निवडून आला आहे. येथे ११ पैकी ८ सदस्य मुरकुटे गटाचे निवडून आले आहेत. तर भेंडा येथे घुले + […]