आपल्या पक्षाने आपल्याला संधी दिल्यास कन्नड मतदारसंघातून विधानसभा (संजना जाधव यांच्याविरुद्ध) आणि जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार अशी माहिती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी […]
मुंबईवर त्यांच्या डोळा आहे. त्यांना मुंबईची बदनामी करायची आहे. एवढेच यांचे काम आहे. मुंबईवर यांचा राग असल्याने हे काम सुरु आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी मुंबई महापालिकेची कॅगद्वारे चौकशी होणार असे जाहीर केले होते. त्यावरुन सभागृहात आज […]
मुंबई : आज विधिमंडळ अधिवेशनाचा (Legislative Session) शेवटा दिवस आहे. हे अधिवेशन अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे ह्या विधिमंडळात आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन आल्या होत्या. तेव्हा विधिमंडळातील हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्यांनी विधिमंडळातून काढता पाय घेतला होता. माध्यमांनी ही बातमी उचलून धरल्यानंतर अनेकांनी सरकारवर टीका केली होती. दरम्यान, आता […]
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सध्या मालेगाव येथे आहेत. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची 26 तारखेला उद्या मालेगाव येथे सभा होणार आहे. याआधी राऊत हे सभेची तयारी करण्यासाठी मालेगाव येथे आलेले आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी बोलताना दादा भुसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. दादा […]
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला तसेच त्यांनी यावेळी शिंदेंना आव्हान देखील केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढवा आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे. आमची ताकद चोरून […]
भाजपचे नेते व आमदार नितेश राणे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांना ओबीसी समाजाच्या विषयी वक्तव्य करायला आम्ही सांगितलेले नाही. त्यांनी देशाविरधात वक्तव्ये केलेले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. ओबीसी समाजाच्याविषयी वक्तव्य करायला आम्ही त्याला सांगितले नाही. मोदी सगळे चोर आहेत, असे वक्तव्य करायला […]