नागपूर : अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी सभागृहात महाविकास आघाडीने सभागृहात जोरदार निदर्शने केली. शिवाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राजीनामा द्या राजीनामा […]
नागपूर : ‘आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे.’ अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. यात […]
जळगाव : नुकतीच जळगाव जिल्हा दुध संघाची निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध मंत्री गिरीश महाजन , पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे पॅनल होते. चुरशीच्या लढतीत गिरीश महाजन यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला. दरम्यान, निवडणुकीत पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या चर्चांना उधाण असतानाच भालोद गावातील निवडणुकीच्या पैशांच्या वाटणीवरुन वाद सुरु असल्याचा व्हिडिओ […]
पुणे : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा शनिवारी (ता.२४ डिसेंबर) पहाटे अपघात झाला होता. यामध्ये आमदार गोरे जखमी झाले असून त्यांचे सहकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संकट काळात आमदार गोरेंनी पहिला फोन लावला तो […]
नागपूर : ‘मला एक तरी उदाहरण असं दाखवा की, महाराष्ट्रात कन्नड भाषिकांवर अत्याचार करण्यात आले. मात्र कर्नाटक सरकार तेथील मराठी भाषिकांवर अत्याचार करते. या अगोदर काहींनी सभागृहात सांगितलं की, आम्ही देखील सीमावादामध्ये लाठ्या खाल्ल्या आहेत. मात्र तुम्ही लाठ्या खाल्ल्या त्यावेळेस तुम्ही आमच्या पक्षात होतात. आता तुम्ही सीमापार गेले आहात. कर्नाटक, महाराष्ट्रात आणि दिल्लीत सध्या एकाच […]
नागपूर : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसून येत आहे. त्यातच आज याच मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव न मांडल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या अशी सभागृहात विनंती करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडीच्या […]