Manoj Jarange : जालन्यातील अंतरवली सराटी येथील दगडफेक प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारच्या हेतूवरही त्यांना प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने आमच्याच काही लोकांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेचे कारण काय? […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर आजारपणावरून होणाऱ्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मला डेंग्यू झाल्यानं 15 दिवस गेले. मला राजकीय आजार आहे. असं मी टिव्ही वर बघितलं. पण मी लेचापेचा नाही. माझ्या स्वभावात राजकीय आजार वगैरे नाही.’ […]
Uddhav Thackeray : देश आणि राज्याच्या राजकारणात सध्या ‘पनौती’ हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. कोण कुणाला पनौती आहे यावरून खोचक टोलेबाजी सुरू आहे. याच शब्दाचा आधार घेत उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनातून मोदी सरकावर खोचक फटकेबाजी केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधानांना पनौती म्हटले व पनौती या शब्दाचे विश्लेषण केले. पनौती म्हणजे […]
Ajit Pawar : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकारणातही सध्या याच मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. आता याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या […]
NCP Crisis : राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. आता हा वाद निवडणूक आयोगासमोर असून सुनावणी सुरू आहे. आता आज निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सुनावणीबाबत आव्हाडांचं […]
Sunil Tatkare On Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) कुणाचा याची निवडणूक आयोगासमोर (Election Commission) लढा सुरू असतांना अजित पवार गटाचे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे. श्रीनिवास पाटील यांच्या भाषणाचा मुद्दा उपस्थित करून सुप्रिया सुळे लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत […]