राहुरीत भाजप की राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार ? धर्मसंकट म्हणत तनपुरेंनी पुन्हा…

Prajakt Tanpure - ही जागा राष्ट्रवादीने लढली नसतील तर महाविकास आघाडीतील इतर पक्ष लढले असते.

  • Written By: Published:
Prajakta Tanpure Rahuri

Prajakt Tanpure On Rahuri By election: राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (
Prajakt Tanpure) यांनी माघार घेतलीय. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिलीय. तालुक्यातील प्रश्न सत्ताधारी महायुती सरकार सोडविणार असल्याने निवडणूक लढवत नसल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी जाहीर केले आहे. एकप्रकारे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना मदतच केली आहे. प्राजक्त तनपुरे हे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचे सांगत आहे. परंतु ते आता मतदारसंघात स्वतःच्या पक्षाच्या प्रचार करणार की भाजपचा हा प्रश्न आहे. यावर त्यांनी लेट्सअपशी संवाद साधला.

उमेदवाराच्या प्रचाराबाबत तनपुरे म्हणाले, पक्षाने उमेदवार दिलेला आहे. प्रचार कुणाचा करायचा हे माझ्यापुढे धर्मसंकट आहे. एकतर मतदारांमध्ये सहानुभूतीची किनार आहे. त्यांचे वडिल वारलेले आहेत, भावनिक वातावरण आहे. तरीही सुद्धा माझा निवडणूक लढण्याचा आग्रह होता. परंतु तालुक्यातील काही प्रश्न होते. राहुरीतील काही भागात दारुगोळा साठवणूक केंद्राचे आरक्षण पडणार आहे. त्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुळा धरणाचे गाळ काढण्याचा प्रश्न आहे. तालुक्यात नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. या परिस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक विश्वास दर्शविला आहे. त्यामुळे शेवटी मी थांबण्याची भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी लढायचे आणि पद घ्यायचे. त्यापेक्षा प्रश्न सुटणं महत्त्वाचे होते. भावनिक किनार होती, त्यामुळे मी माघार घेतली आहे.


मोकाटेंना उमेदवारी हे मला उशीरा कळलं

दुसरीकडे पक्षाने गोविंद मोकाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याचे मला उशीरा कळले आहे. आता कुणाचा प्रचार करायचा हा प्रश्न माझ्यासमोर आहे. हे धर्मसंकट आहे. याबाबत तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय योग्य घेणार आहे. मुद्दे सुटणार असले तर परत विरोध करायचा का ? दुसऱ्या बाजूला पक्षाचा विचार आहे. ते तेखील विषय आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक निर्णय घेणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. भाजप प्रवेशाचा विषय येतो कुठे ? असल्याचे ते म्हणाले.

बिनविरोधसाठी तनपुरे पहिल्यापासून आग्रही
ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आहे. ही जागा राष्ट्रवादीने लढली नसतील तर महाविकास आघाडीतील इतर पक्ष लढले असते आणि भविष्यात निवडणुकीत महाविकास आघाडीतील इतर पक्षाने जागा मागितली असती. त्यामुळे पक्षाने निवडणुक लढली असावी. ही जागा बिनविरोध करण्यासाठी मी पक्षातील नेत्यांशी बोललो होतो, मी त्या नेत्यांचे नाव सांगणार नाही, असा गौप्यस्फोटही तनपुरे यांनी केलाय.

follow us