राहुरीचा रिमोट कंट्रोल आता सुजय विखे यांच्या हातीच; अक्षय कर्डिलेंना बळ देणार?

Sujay Vikhe यांनी कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीची सूत्रे हाती घेतली आहे. यामुळे विखेंनी राहुरीचा रिमोट कंट्रोल हाती घेतल्याची चर्चा आहे.

Sujay Vikhe

Rahuri’s remote control is now in hands of Sujay Vikhe; Will give strength to Akshay Kardile after Shivajirao kardile ? राहुरीचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले व मतदार संघावर शोक काळा पसरली. आता मतदार संघाचे भवितव्य काय अशी चित्र असतानाच भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी राहुरी तालुक्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहे. सुजय विखे यांचे नेतृत्वाखाली राहुरी पाथर्डी व नगर तालुक्यातील बुरानगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे व पुढील राजकीय दिशा ठरविण्यात येणार आहे यामुळे एक प्रकारे विखे यांनी राहुरी चा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हाती घेतला असल्याचे देखील चर्चा आहे.

कधी सीमा तर, कधी स्वीटी म्हणून ब्राझिलियन मॉडेलने मतदान केले’, राहुल गांधींनी ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडला

कर्डिलेंच्या निधनानंतर  पोट निवडणूक होण्याची शक्यता

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मध्ये पोट निवडणूक होण्याची देखील शक्यता आहे यासाठी कर्डिलें यांचे विरोधक असलेले प्राजक्त तनपुरे हे देखील आता चाचपणी करत असून मतदारसंघांमध्ये त्यांनी देखील वावर वाढवला आहे. दरम्यान विखे देखील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत पुढील राजकीय दिशा ठरवत आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता राहुरी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि दोन नगरपालिकांच्या निवडणुका या होणार आहेत त्यासाठी आता खुद्द सुजय विखे हे दंड थोपटून तालुक्याच्या राजकारणात उतरून रिंग मास्टर ची भूमिका बजावणार आहेत.

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

विखेंच्या एंट्रीने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार

कर्डिले यांच्या निधनानंतर विरोधी गट म्हणजेच तनपुरे गटाला याचा फायदा होईल व निवडणुका सहज जिंकता येईल असे चित्र असतानाच विखे यांच्या एंट्रीने कुठेतरी पुन्हा एकदा या ठिकाणी राजकीय वातावरण तापणार असे चित्र दिसून येत आहे. आगामी निवडणुका राहुल तालुक्याच्या राजकीय उंबरठ्यावर येऊन ठेपले असून त्याची मोर्चे बांधणी करण्यासाठी राहुरी तालुक्यात एक राजकीय मेळावा विखे कर्डिले गटाकडून आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यातून आगामी निवडणुकांची रणनीती आखली जाणारा असून या मेळाव्याला विखे कर्डिले गट काय डावपेच मांडतात यावरती तालुक्याची राजकारणाची दिशा ठरणार आहे.

Dadabhau Kalamkar : पवारांचे विश्वासू कळमकर यांच्या हाती जिल्हाध्यक्ष पदाची धुरा

दरम्यान पोट निवडणूक झाल्यास माजी आमदार राहिलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्याकडून देखील आता मतदारसंघात नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत तसेच नगर मनमाड रस्त्यावरून प्राजक्त तनपुरे हे आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरत आहे यामुळे नागरिकांच्या समस्यांचे मुद्दे घेत एक प्रकारे तनपुरे यांच्याकडून निवडणुकीची मतपेरणी केले जात असल्याचे बोलले जात आहे.

विखे अक्षय कर्डिले यांना बळ देणार?

शिवाजीराव कर्डिले यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती त्यानंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी देखील मतदारसंघांमध्ये जात भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरू ठेवले होते दरम्यान कर्डिले यांच्या अकस्मात निधनाने आता मतदारसंघाची धुरा अक्षय कर्डिले यांच्या वरती आले आहे. पोटनिवडणूक झाल्यास अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली जाणार का याकडे देखील राहुरी तालुक्यातील लक्ष आहे. कर्डिले यांच्याशी एकनिष्ठ राहिलेला गटाने अक्षय कडले यांनाच उमेदवारी द्यावी असा सूर धरला आहे दरम्यान भाजप येणाऱ्या काळात याबाबत काय निर्णय घेत नाही तसेच विखे यांची भूमिका काय असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us