भाजप-मनसेचे फाटले; राज ठाकरेंचा पुन्हा यु-टर्न : भेदभाव केल्याचा आरोप करत PM मोदींवर टीका
Raj Thackeray : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील तोफ डागलीय. क्रीडा क्षेत्रासाठी गुजरात आणि उत्तर प्रदेशसाठी सर्वात जास्त निधी देण्यात आला आहे. हे योग्य नाही, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेदभाव करत असल्याचा थेट घणाघात राज यांनी केला आहे.
राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा; मराठवाड्यावर विशेष फोकस, सर्व जिल्ह्यांना देणार भेटी
महाविकास आघाडी किंवा महायुती असा प्रश्न आहे. जे चूक आहे ते चूक आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्पोर्टसाठीचे सर्वाधिक बजेट गुजरात आणि यूपीला देण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी सर्व राज्यांना समान न्याय द्यायला हवा. त्यांनी सर्व राज्यांना समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते गुजरातमध्ये ऑलिम्पिक आणू पाहात आहेत, सर्वात मोठं स्टेडियम बांधायचं आहे ते देखील गुजरातमध्ये, असं कसं करून चालेल, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली. दरम्यान, लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावरून आता राजकीय वर्तुळासह कार्यकर्तेही उलट-सुलट चर्चा करत आहेत.
Lok Sabha नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून मोठी घोषणा !
मनसेच्या 16 संभाव्य उमेदवारांची यादी
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील 36 विधानसभा जागेवर मनसेचे 16 संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली होती. यात शिवडी विधानसभेतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच माहिम विधानसभा मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं बोललं जात आहे.