VIDEO : राज ठाकरे गुढीपाडव्याला कोणती मोठी घोषणा करणार? टीझरमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

Raj Thackeray Gudi Padwa Rally 2025 Municipal Elections Strategy : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी केलीय. त्यांनी गुढीपाडवा मेळाव्याचं रणशिंग फुंकलं आहे. या मेळाव्यासाठी देखील मनसेने (MNS) चांगली तयारी केलीय. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात (Municipal Elections Strategy) महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यामध्ये (MNS Melava) राज ठाकरे काय बोलणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याचा एक टीझर शेअर केलाय. त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन मनसेने 1 मिनिटाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये ढीपाडवा मेळावा 2025 आणि MNS Adhikrut असं नमूद करण्यात आलाय.
राज ठाकरे यांच्या मनसेचा नुकताच काही दिवसांपूर्वी वर्धापन दिन पार पडला. या टीझरमध्ये त्याच भाषणातील काही मुद्दे ऐकायला मिळत आहे. ‘निछड्या छातीचा मराठी अभिमान’, ‘अभेद्य एकजूट’ असे शब्द देखील ऐकायला मिळत आहे. तसंच या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मी 30 तारखेला बोलणार आहे. जल्लोषामध्ये गुलाल उधळत सर्वांनी शिवतीर्थावर यावं, अशी विनंती देखील केलीय. या व्हिडिओमधून त्यांनी या गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी उभारू, असं आवाहन देखील केलंय.
#गुढीपाडवामेळावा२०२५#MNSAdhikrut pic.twitter.com/1H2TV5ZFOO
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 24, 2025
‘कोरटकरला वाचवणारी यंत्रणा…जनतेसमोर आणा’ अटकेनंतर, इंद्रजित सावंत यांची मोठी मागणी
नुकताच चिंचवडमध्ये मनसेचा 19 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला आहे. आता मनसेचा गुढीपाडव्या मेळाव्याचा टीझर रिलीज झाला आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे या मेळाव्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही मोठी घोषणा करतात का, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. टीझरमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.