सावरकर, टीकाकारांना कळले नाही अन् त्यांच्या नावाने मतं मागणाऱ्यांनी तरी वाचले का? राज ठाकरेंचा परखड सवाल

Raj Thackeray यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींना देखील परखड सवाल विचारत सावरकरांच्या विचारांबाबत पोस्ट लिहीली आहे.

Raj Thackeray 2

Raj Thackeray’s sharp question to BJP and Congress on Swatantraveer Sawarkar Birthanniversary : आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींना देखील परखड सवाल विचारत सावरकरांच्या विचारांबाबत पोस्ट लिहीली आहे. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावकरांवर ते हिंदुत्ववादी गांधी हत्येच्या आरोपींशी संबंधित या न अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यावर काँग्रसकडून टीका केली जाते तर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या भजपकडून देखील त्यांच्या विचारांची योग्य अंमलबाजवणी केली जात नाही. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत.

ब्रेकिंग : डी. के. शिवकुमार यांना साथ द्या; ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये सिद्धरामय्या यांची राजीनाम्याची घोषणा

तसेच सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का? याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का? हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का? सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणं मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य-असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं.

ब्रेकिंग : रखरखत्या उन्हात बाज टाकून करणार उपोषण, जरांगेंची आंदोलनाबाबत मोठी घोषणा

हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हाट्सअप विद्यापीठात काय आलंय? ते चूक-बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे. याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागल्याचं दिसत आहे. आणि आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्वल होती हे न बघता उत्सव, डीजे याच्यात आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे.

सावरकर हे प्रखर हिंदू धर्माभिमानी होते, पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरु आहे. जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला. त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरु आहे. याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत.

सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा झटका! पुणे-नाशिकमध्ये दरवाढ, पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅसही महाग

उठता बसता सावकरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे? मी गेल्या २ महिन्यांत दोन वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय.

होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणावाचा स्फोट; इराणला साथ दिल्यास ओमानला उडवून देऊ, डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी

याचं कारण आपण कोण होतो? हेच आपण विसरलो तर पुढे कुठे जायचं? याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत? यासाठी जर आपण सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हाट्सअप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे. आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे. ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं हे करणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. अन्यथा तो उपचार ठरेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन!

follow us