‘फडणवीस हा एकच बाप असा भेटला की, शरद पवारांना पुरुन उरला’; सदाभाऊंची जळजळीत टीका
Sadabhau Khot On Sharad Pawar : फडणवीस हा एकच बाप असा भेटला की तो शरद पवार (Sharad Pawar) यांना पुरुन उरला, असल्याची जळजळीत टीका रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. दरम्यान, आपल्या स्पष्टोक्तपणामुळे सदाभाऊ खोत सर्वांनाच परिचित आहेत. ते नेहमीच शरद पवार यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका-टिप्पणी करीत असतात. आताही त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खोत कोल्हापुर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
कोल्हापूरच्या बंडखोराविरोधात काँग्रेसचं कठोर पाऊल : ठाकरेंच्या मागणीनंतरही विशाल पाटलांना मात्र अभय?
सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार यांचं अडनाव फडणवीस असतं तर त्यांना कोणीही विचारलं नसतं, देवेंद्र फडणवीस हा एकच बाप त्यांना असा भेटला की पुरुन उरला आहे. देशातील तळागाळातील समाज मोदींच्या पाठिशी असल्याचा विश्वासही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. तसेच मागील 70 वर्षांच्या राजकारणात राज्यात काही मूठभर सरदाराच राजे होते. या सरदारांना पायाखाली तुडवणारे देवेंद्र फडणवीस होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकारची सत्ता उलथवून टाकली आहे, त्यामुळे थेट शरद पवार यांना फडणवीस यांची जातच काढावी लागली असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलायं.
तसेच आमचा लढा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना न्याय देण्याचा होता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुख दिसलं पाहिजे, आम्हाला काही मिळण्यापेक्षा शेतकऱ्यांना काय देणार ही आमची भूमिका होती. आम्ही सर्वच घटक पक्ष भाजपसोबत असल्याचंही सदाभाऊ खोत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच शरद पवार यांना एकच बाप असा भेटला तो शरद पवारांना पुरुन उरला म्हणूनच पवार यांना खोटे बोलून रेटून चालावं लागत असल्याची टीका खोत यांनी केली आहे.
विशाल पाटलांचं नाव येताच ठाकरे भर पत्रकार परिषेदत म्हणाले, “त्यांनी बंडखोरी केली..”
दरम्यान, देशासह राज्यातील काही भागांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपत असल्याची परिस्थितीत सध्या राज्यात दिसून येत आहे. विदर्भातील पाच जागांसाठी नुकतंच मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या पाचही जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावा सत्ताधारी आणि विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आज आता सदाभाऊ खोत शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. आता शरद पवार खोत यांच्या टीकेवर काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.