ब्लॅक बॉक्स पाऊस, ऊन, आग आणि बॉम्बस्फोटापासून सुरक्षित पण… अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचं मोठं विधान
Rohit Pawar यांनी अजित पवारांच्या अपघाती विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत विचारले असता मोठं विधान केलं आहे.
Rohit Pawar’s big statement about Ajit Pawars accident Black box : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक महत्वाची माहिती समोर आली असून, पहिल्यांदाच विमान अपघात तपास ब्युरोकडून अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाल्याचं विमान अपघात तपास ब्युरोकडून सांगण्यात आलं आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार अजित पवारांच्या अपघाताबाबत आणखी गौप्यस्फोट करण्यासाठी उद्या 18 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी ते याबाबत बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्या अगोदर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांना अजित पवारांच्या अपघाती विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत विचारले असता त्यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून उन्हापासून आगीपासून बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही. आता अजितदादांच्या अपघाती विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबतील काय राजकारण चाललं आहे. हे पाहावं लागेल.
तसेच यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, विमानातील दोन्ही रेकॉर्ड डाटा रिकव्हर करण्याचा काम सुरू आहे. सदर रेकॉर्डवर आगीचा दुष्परिणाम झाला आहे. ज्या ठिकाणी विमान बनलं. त्या देशातून अधिकृत प्रतिनिधी कडून माहिती मागवली आहे. एअर एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरोची माहिती समोर आली आहे. रोहित पवार उद्या धक्का दे खुलासे करण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या खाजगी गुप्तहेर संस्थेकडून तपास कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर स्टोरी ठेवल्याचा राग अनावर; दोन गटातील हाणामारीत एकाचा मृत्यू
दरम्यान आज 17 फेब्रुवारी रोजी रोहित पवार हे ईडीच्या केस संदर्भात सत्र न्यायालयात आज हजेरी लावली. विषय संपल्याचा ईओडब्ल्यू ने ईडीला सांगितलं होतं. राष्ट्रीय अध्यक्ष पदा बाबत सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलेला आमदारांचा अभिनंदन करतो. सुनेत्रा काकीच राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत. आमच्यासाठी विलीकरणाच्या विषयाला पूर्णविराम लागला.
