‘अजितदादांनी उद्या डोनाल्ड ट्रम्पशी युती…’, रुपाली ठोंबरेंचं मोठं विधान

  • Written By: Published:
‘अजितदादांनी उद्या डोनाल्ड ट्रम्पशी युती…’, रुपाली ठोंबरेंचं मोठं विधान

Rupali Thombre Patil : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) यांनी त्यांची भेट घेतली. आणि शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर सुनंदा पवार यांनीही शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं, असं विधान केलं. त्यावर रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.

शांती टॉकीज अन् चियान विक्रम येणार एकत्र, “चियान 63” चित्रपटची घोषणा 

अजितदादांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी तो निर्णय आम्हाला मान्यच असेल. उद्या दोन्ही गट एकत्र आल्यास अजित पवारांवर आरोप करणारे नेतेच अधिक नाराज होतील, असं ठोंबरे म्हणाल्या.

आज माध्यमांशी बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, सुनंदा पवार या कुटुंबाचा एक भाग आहेत. त्यामुळे एकत्र येण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र अजित पवार जो निर्णय घेतील, तो महत्वाचा असेल. जेव्हा फूट पडली, तेव्हा प्रत्येकालाच याबद्दल दु:ख वाटले होते. वेगळे न होता आपली वज्रमूठ घट्ट राहिली पाहिजे, असं सर्वांनाच वाटलं. लोकसभा आणि विधानसभेच्या निकालानंतरही अजित पवारांनी समोरच्या लोकांवर टीका केली नाही. पण, शरद पवारांच्या आजूबाजूच्या लोकांनीच अजित पवारांवर नको ती टीका केली, असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश! हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती… 

पुढं त्या म्हणाल्या, दोन्ही पवार एकत्र आल्यास शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांची कुचबणा होईल, असाही आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला. मुळात राष्ट्रवादीत दोन गट पाडण्यात अंकुश काकडे आणि त्यांच्यासारख्या इतर नेत्यांचाच जास्त सहभाग आहे. उद्या अजित पवारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तरी तो आम्हाला मान्य असल. तसेच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी तो निर्णय आम्हाला मान्यच असेल. उद्या दोन्ही गट एकत्र आल्यास अजित पवारांवर आरोप करणारे नेतेच अधिक नाराज होतील, असेही रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

दरम्यान, शरद पवार आणि अजितदादांनी पुन्हा एकत्र आले पाहीजे, अशी चर्चा १२ डिसेंबरपासून सुरू झाली. दरम्यान, आगामी काळात शरद पवारांसोबत अजित पवार जाणार की नाही, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube