Sanjay Raut : मुलुंडच्या पोपटाला सगळी माहिती कशी कळते; राऊतांचा सोमय्यांवर निशाणा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 11T132233.446

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली आहे. यावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कदम यांच्यावर फक्त सुडबुद्धीने कारवाई करण्यात येते आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केली आहे. तसचे या सगळ्याची माहिती मुलुंडच्या पोपटाला कशी मिळते, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

ही कारवाई आहे ती पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत. सदानंद कदम हे शिवसेनेच्या पदावर नसतील पण ते शिवसेनेच्या परिवारातले आहेत. सदानंद कदम यांना काल अटक केली आणि त्या आधी त्यांना अटक होणार असे म्हणत मुलुंडचे पोपटलाल बोंबलत होते, असा टोला त्यांनी सोमय्यांना लगावला आहे.

Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…

सदानंद कदम यांना अटक करण्याचे कारण काय आहे ? कधी रिसॉर्ट सुरू झालेला नाही. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची खेडची सभा यशस्वी होण्यामागे असंख्य लोक मेहनत घेत होते. त्यांच्यामध्ये सदानंद कदम आहे. या एका कारणामुळे सदानंद कदम यांना  यांना अटक केली आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे. अटक करण्याची बातमी ईडीने देण्याऐवजी मुलुंडच्या पोपटलाल जाहीर करतो असं काय आहे, असे म्हणत त्यांनी सोमय्यांना टोला लगावला आहे.

Maharashtra Budget : आम्ही गाजर हलवा तरी दिला त्यांनी तर फक्त गाजरं दिली होती, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

दरम्यान किरीट सोमय्यांच्या विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा त्याला क्लीन चिट दिली. या देशाच्या बँका बुडवणाऱ्या लोक भारतीय जनता पक्षाचे लोक मुंबईत काम करतात. मी भविष्यात काही साखर कारखान्यांची यादी देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे त्या संदर्भात देखील चौकशी करणार आहे का? असा प्रश्न देखील सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube