घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा न देणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या मंगळसूत्राची उठा ठेव करू नये; राऊतांचा मोदींना टोला

घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा न देणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या मंगळसूत्राची उठा ठेव करू नये; राऊतांचा मोदींना टोला

Sanjay Raut Criticize PM Modi on Statement About Mangalsutra : पंतप्रधान नरेंद्र मोदी
( PM Modi ) यांनी हिंदु महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्राबाबत विधान ( Statement About Mangalsutra ) केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील मोदींवर निशाणा साधला आहे. जो माणुस घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही. त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्राची उठा ठेव करू नये. असं राऊत म्हणाले.

मोठी बातमी : काँग्रेसच्या अन् भाजपच्या तक्रारींना यश; मोदींसह राहुल गांधींना EC ची नोटीस

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, तसे तर नरेंद्र मोदी हे बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागले आहेत. पाकीट मारी करायला लागले आहेत. ही भाजपची भूमिका आहे का? खरं तर काँग्रेसच्य नाही तर भाजपच्या राज्यातच महिलांचे मंगळसूत्र गहाण पडत आहेत. तसेच जो माणुस घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्राची उठा ठेव करू नये. असा टोला देखील यावेळी राऊत यांनी मोदींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून लगावला आहे.

राजकीय वनवासातही संपत्तीत कोटींची उड्डाणे : कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा केलेल्या पंकजांच्या श्रीमंतीची राज्यात चर्चा

या देशातील महिलांची मंगळसूत्र का लुटली गेली का विकली गेली? तर मोदींनी नोट बंदी आणली. त्यासाठी लाखो महिलांना मंगळसूत्र गहाण ठेवावी. लागली विकावी लागली. मोदींनी जे लॉकडाऊन केले हजारोंचा जो रोजगार गेला. त्यावेळेला लाखो महिलांना आपले मंगळसूत्र विकून आपले घर चालवावे लागले. काश्मीर मधील पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्र ही मोदी पुरस्कृत, भाजप पुरस्कृत दहशतवाद्यांकडून लुटली गेली. मणिपूरमध्ये देखील महिलांची मंगळसूत्र गेली त्याला देखील मोदी जबाबदार आहेत, किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली? असा सवाल राऊतांनी केला.

काय म्हणाले होते मोदी?

देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर तुमच्या वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रं जास्त मुलं असणाऱ्यांना दिली जातील, असं मोदी म्हणाले होते. काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा मांडल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. या जाहीरनाम्यात संपत्तीच्या न्याय वाटपाचा उल्लेख होता. पण भाजपने हा मुद्दा थेट लोकांचा कष्टाने कमावलेला पैसा हिसकावून इतरांमध्ये वाटणार असल्याच्या वळणावर नेला.

तुमच्या घरी किती पैसा आहे, किती सोनं आहे, किती चांदी आहे या गोष्टी काँग्रेस शोधून काढेल. ही संपत्ती वाटली जाईल. अगदी महिलांचं मंगळसूत्रही हिसकावलं जाईलं, अशी भीती मोदींनी व्यक्त केली. याशिवाय माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या जुन्या एका भाषणाचा आधार घेत या कमाईवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, ही कमाई ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना वाटली जाईल, घुसखोरांना दिली जाईल, असाही दावा मोदींनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube