‘भाजपला फायदा होईल असे निर्णय घेता, 4 तारखेला दाखवून देऊ’; संजय राऊत ज्ञानेश कुमारांवर भडकले
Sanjay Raut On Gyanesh Kumar; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Sanjay Raut On Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांनीही ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याचा दावा राऊत यांनी केला. ‘भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जात असल्याचा आरोप इतर दोन आयुक्तांनी ज्ञानेश कुमारांवर केला. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’, अशी मागणी राऊतांनी केली.
2027 वर्ल्डकप माझा शेवटचा असेल; विराट कोहली म्हणाला, ‘ट्रॉफीसाठी सर्वस्व पणाला लावणार’
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा म्हणजेच SIRचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला. SIRच्या माध्यमातून तब्बल 13 कोटी मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रक्रियेविरोधात देशभरात नाराजी असल्याचं सांगत राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले.
‘भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे’, असा आरोप संजय राऊत यांनी केला. निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या या प्रश्नांवर देशभरातून आवाज उठवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.
महाराष्ट्रात दुष्काळ, तर गडचिरोलीत पुराचा तडाखा; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला
4 ऑक्टोबरला स्वतंत्र मोर्चा
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 2 ऑक्टोबरला आंदोलनाची हाक दिल्याचा उल्लेख राऊत यांनी केला. या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात होणार असून, त्यानंतर हा मुद्दा व्यापक पातळीवर नेण्याची भूमिका असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 4 ऑक्टोबरला स्वतंत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचंही राऊत यांनी सांगितलं. या मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेबाबतचे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.
‘राजकीय पक्षांनी एकत्र यावं’
या मुद्द्यावर राज्यातील इतर राजकीय पक्षांनीही एकत्र येण्याचं आवाहन संजय राऊत यांनी केलं. निवडणूक प्रक्रियेबाबत विरोध व्यक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे मोर्चा काढावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी राऊत यांनी पुन्हा एकदा केली. निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सुरू असलेल्या या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर आगामी आंदोलनांकडे आता लक्ष लागलं आहे.