राज ठाकरे अन् राहुल गांधींचा पडद्याआड संवाद…प्रत्युत्तरामध्ये राऊतांची उडी; ठाकरेंचंही ‘हम्म’ उत्तर, सगळेच हसले!

राज ठाकरे आणि राहुल गांधींच्या संवादाबाबत प्रश्न विचारताच खासदार संजय राऊत यांनी सारवा-सारव केल्याचं चित्र दिसून आलं.

Raj Udhav Sanjay

Sanjay Raut & Raj Thackeray News : सध्या देशात मतदार याद्यांचा घोटाळा आणि SIR चा मुद्दा चांगलाच तापला आहे. कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर आता ठाकरे बंधूंनीही SIR विरोधात पुढाकार घेतला आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी ठाकरे बंधूंच्या मुंबईत मोर्चाची घोषणा करण्यात आलीयं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray), खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद देत माहिती दिलीयं.

Garambicha Bapu : कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी, नव्या चित्रपट रूपात

ठाकरे बंधूंच्या या पत्रकार परिषदेदरम्यान एक लक्षवेधक गोष्ट घडल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात पडद्यामागून बोलणं सुरु असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. संजय राऊतांच्या वक्तव्याचा दाखल देत पत्रकारांनी पत्रकार परिषदेत थेट राज ठाकरेंनाच हा सवाल केला. पत्रकारांकडून हा सवाल करताच संजय राऊत यांनी मध्येच उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. पत्रकारांच्या या प्रश्नावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली. मी असं म्हणाला होतो की, एसआयआर आणि निवडणूक आयोगाच्या प्रश्नावर सगळ्यांचा एकमेकांशी संवाद आहे. राऊतांच्या या उत्तरानंतर राज ठाकरे यांनी स्मित हास्य करीत बघत अर्थपूर्ण पद्धतीने ‘हममम’ असे उद्गार काढले. याचवेळी परिषदेतील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

जामखेडच्या कला केंद्रातील वाद अन् गर्भवती महिलेची हत्या, पिंकी काटकर हत्या प्रकरणात चौघांना अटक

पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मी म्हणालो होतो की, या प्रश्नावर सगळ्यांचा एकमेकांशी संवाद असून या विषयावर एकत्रित लढा दिला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे स्वत: या सगळ्यात पुढाकार घेत आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आधी केलेल्या वक्तव्यावर सारवासारव करीत असल्याचं चित्र दिसून आलं होतं.

follow us