बारामती नव्या नेतृत्वाचा स्वीकार करेल; नातवाचा अर्ज दाखल करताच पवारांकडून निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट

बारामती नव्या नेतृत्वाचा स्वीकार करेल; नातवाचा अर्ज दाखल करताच पवारांकडून निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट

Yugendra Pawar File Nomination In Baramati : बारामती विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीकडून शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता, त्यांनी अर्ज दाखल केलाय. आता बारामतीत काका विरूद्ध पुतण्या म्हणजेच अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार (Yugendra Pawar) अशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

शरद पवार म्हणाले की, युगेंद्र पवार यांचं शिक्षण परदेशात झालंय. त्यांच्या रूपात बारामतीत आम्ही उच्चशिक्षीत, पदवीधऱ उमेदवार दिलाय. बारामती नव्या नेतृत्वाचा स्वीकार करेल, अशी आशा (Baramati Assembly Election) आहे. युगेंद्र पवार या तरूण उमेदवाराचा अर्ज आम्ही भरला. जनतेशी बांधिलकी ठेवा, विनम्रता असा सल्ला शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना दिलाय. तर बारामतीकरांसाठी काम करत राहणार, असं आश्वासन देखील युगेंद्र पवार यांनी दिलंय.

शंकर जगताप मुलासारखेच…1 लाखांच्या लीडने विजयी होणार ; अश्विनी जगताप प्रचारासाठी मैदानात उतरल्या

इतके वर्ष सत्ता असताना लाडक्या बहिणींची आठवण आली नाही, अशी टीका शरद पवार यांनी विरोधकांवर केलीय. पक्षफुटी, सत्तेचा गैरवापर लोकांना आवडलेला नाही. लोकसभा निकालानंतर लाडक्या बहिणींची आठवण आली, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे. जनतेच्या हिताची जपणूक करणारं सरकार देवू, असं आश्वासन शरद पवार यांनी दिलंय. दोन दोन ठिकाणी अर्ज भरलेल्या जागांवर पुन्हा करू. मविआत बहुतांश जागांवर एकमत झालंय. आम्हाला महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचं आहे, असं शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

मला मारण्यासाठी थोरातांनीच हे सर्व कटकारस्थान रचले; सुजय विखेंचा गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीत बारामतीकर योग्य निर्णय घेतील, असा विश्वास शरद पवारांनी आज व्यक्त केलाय. अजित पवार हे आतापर्यंत राष्ट्रवादीचे आमदार म्हणून बारामतीत निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात काका शरद पवार यांनीही पुतण्याचे कार्ड खेळले आहे. बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू असून अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. शरद पवार यांनी अजित यांच्या पुतण्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आता बारामतीकर कोणाला कौल देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube