शिंदे गटाच्या चार तर अजितदादा गटाला..,; निवडणुकीच्या निकालावर चव्हाणांचा अंदाज काय?

शिंदे गटाच्या चार तर अजितदादा गटाला..,; निवडणुकीच्या निकालावर चव्हाणांचा अंदाज काय?

Pruthviraj Chavan : राज्यात मागील दिवसांत चार टप्प्यांत लोकसभा निवडणूक (Loksabha Election) पार पडलीयं. अशातच आता राज्यातील राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनीही आपला अंदाज वर्तवला असून ‘अबकी बार चारसो पार’ची घोषणा मोदींच्या अंगलट येणार असून शिंदे गटाला (Shinde Group) चार तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलायं. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

दक्षिणेत भाजपला किती यश मिळणार? वाचा राजकीय रणनितीकार पीके काय म्हणाले

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात मागील निवडणुकीपेक्षा सध्या वेगळी परिस्थिती आहे. मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएम पक्षाची युती असल्याने त्यांना चांगल्या प्रमाणात मते मिळाली होती. एमआयएम आणि वंचितला मागील निवडणुकीत 6 टक्के मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत एमआयएमसोबत नसल्याने वंचितमुळे फटका बसणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

Rohit Saraf: रोहित सराफने ‘इश्क विश्क रिबाउंड’ पोस्टर रिलीज करुन सांगितली चित्रपटाची रिलीज डेट

तसेच यंदाची निवडणूक लोकांनी हातात घेतली असून भाजपला बहुमताचा आकडा गाठणे कठीण दिसून येत आहे. भाजपला 272 चा आकडा गाठणे सध्या अवघड असल्याचं दिसतंय. मागील दोन निवडणुकीत भाजपने हा आकडा गाठला पण देशात सध्या भाजपविरोधात वातावरण असून त्याचा परिणाम म्हणून केंद्रात सत्ताबदल होणार असल्याचीही शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलीयं. तर इंडिया आघाडीच्या 240 ते 260 जागा निवडून येणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

अश्रुधुराचे गोळे, हवेत फायरिंग, अन् 90 जखमी; पाकव्याप्त काश्मिरात का तुटला संयम?

राज्यात काँग्रेसचा 12 जागांवर विजय मिळणार असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अबकी बार चारसो पार ची घोषणा नरेंद्र मोदींच्या अंगलट येणार असून राज्यात शिंदे गटाला चार तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं..

दरम्यान, देशात बेरोजगारी, भ्रष्टाचार, संविधान बचाव हे मुद्दे प्रभावी ठरत असून या मुद्द्यांवरच मोदी आणि भाजपला स्पष्टीकरण देता आलेलं नाही. भाजपकडून 2047 सालच्या विकसित भारताची संकल्पना मांडण्यात आली, मात्र त्यांच्याकडे याबाबत स्पष्टता नसल्याचंही चव्हाण म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube