बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलचं नाही; 1500 रुपयांत बहिणीच नात?..काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
Supriya Sule : दिल्लीतील वातावरण आता खूप बदलेलं आहे. पहिल्यासारखी स्थिती नाही. (Supriya Sule) पूर्वी आमच्या बाजूने फार घोषणा देण्याची परिस्थिती नव्हती. मात्र, आता आम्ही विरोधात नाही तर सत्ताधारी असल्यासारखं वावरतो असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आता विधानसभेला आपलीच सत्ता येणार आहे असा विश्वास व्यक्त केला. त्या महाविकास आघाडी पदाधिकारी मेळाव्यात बोलत होत्या.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार? स्वत: उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, नेमक काय म्हणाले?
आज मोठ्या घोषणा महायुतीकडून झाल्या आहेत. त्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी कुणालाच बहीण आठवली नाही. निकालानंतरच बहिणी आठवल्या असा टोला सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला लगावला. तसंच, आपलं दुर्दैव आहे की, बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलचं नाही. कारण प्रेमात पैसे, व्यावसाय नसतो आणि व्यावसायात प्रेम नसत. हे लोक बोलताना म्हणतात एक बहीण गेली तर दुसरी आणू म्हणजे बहिणीचं नात हे पैशात मोजता असा थेट घणाघातही सुळे यांनी केला आहे.
निवडणुकीनंतर जे दिलेत ते पैसे वापस घेण्याची ताकतही आमच्यात आहे असं काही लोक म्हणत आहेत असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला आहे. तसंच, जर असं पैशात तुम्ही जरबहिणींच नात मोजणार असताल तर हे गलीच्छ राजकारण आहे. परंतु, तुम्ही कुणाचा एक रुपयाही वापस घेऊन बघा मग तुम्हाला मी सांगते असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला.
आता जे मिळतंय ते घ्या पण, भविष्यात लाडकी बहिण योजनेवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
यावेळी त्यांनी मशाल आणि घड्याल याच्या न्यायालयीन लढाईवरही भाष्य केलं. जर तुम्ही ही लढाई चिन्हांची असेल असं समजत असाल तर तस अजिबाद नाही. ही तत्वांची हढाई आहे असं म्हणत आम्ही यातील निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या सोबत असणार आहोत. आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्दही सुप्रीया सुळे यांनी यावेळी सांगितंल. तसंच,ही दडपशाही आम्ही चालू देणार नाही. हा देश संविधानाने चालतो आणि चालणार असंही त्या यावेळी म्हणाल्या.