‘…तर मी कुठूनही निवडणुकीत उभं राहणार’; अंधारेंनी ठणकावून सांगितलं

‘…तर मी कुठूनही निवडणुकीत उभं राहणार’; अंधारेंनी ठणकावून सांगितलं

Sushma Andhare News : पक्षाने मला सांगितलं तर श्रीकांत शिंदेच काय कोणत्याही उमेदवाराविरोधात निवडणूकीत उभं राहणार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘भाजपकडून देशाचा अन् राज्याचा लिलाव’; अर्थसंकल्पावरुन नाना पटोलेंची जहरी टीका

सुषमा अंधारे म्हणाल्या, माझं नाव चर्चेत आहे पण मला अद्याप अधिकृतपणे सांगितलेलं नाही. मला फक्त काम करायचं आहे. माझा तो रुट आहे. मुक्तसंवाद यात्रेचा मार्ग असल्याने मी बुलढाणा, वाशिम, हिंगोली, या मार्गाने आले आहे. पण जर माझ्या पक्षाने मला सांगितलं तर श्रीकांत शिंदेंच काय मी वाटेल त्या उमेदवाराविरोधात लढणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे.

ए एम खानविलकर लोकपालचे नवे अध्यक्ष; आव्हाड म्हणाले, ‘आणखी एक संस्था मोदींनी ताब्यात घेतली…’

तसेच खासदार श्रीकांत शिंदे मोठा अडचणींचा डोंगर असा का वाटतं तुम्हाला? लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तो अडचणीचा डोंगर आहे. पण त्याच्यासमोर समोरं जाताना नाही वाटत की फार मोठं आव्हान आहे. अद्याप मला पक्षाने काहीही सांगितलेलं नाही, जर पक्षाने सांगितलं तर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘मला कापलं तरीही मंडपाला हात लावू देणार नाही’; जरांगे पाटील पुन्हा आक्रमक पवित्र्यात

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांचा राज्यभरात मुक्तसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद सुरु आहे. या मुक्तसंवाद यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अहमदनगरमधील जिल्हा सत्र न्यायालयात बारमध्ये वकीलांशी संवाद साधला होता. यावेळी ठाकरे गटाच्याच महिला पदाधिकाऱ्यांकडून त्यांना विरोध करण्यात आला होता. आधीच्या भाषणांमध्ये सुषमा अंधारे यांनी हिंदु देवतांचा अवमान केल्याचा आरोप अंधारे यांच्यावर ठेवण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज