‘मला कापलं तरीही मंडपाला हात लावू देणार नाही’; जरांगे पाटील पुन्हा आक्रमक पवित्र्यात

..तर विधानसभेला 288 उमेदवार उभे करणार; उपोषण सुरू करताच जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarnage Patil : मला कापलं तरी मंडपाला हात लावू देणार नसल्याचा थेट इशाराच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे. दरम्यान, अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या उपोषणस्थळी पोलिसांकडून मंडप काढण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. यावेळी विरोध करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याचंही सांगण्यात येत होतं. मनोज जरांगे याबाबत समजताच त्यांनी रुग्णालयातून बाहेर येत अंतरवाली सराटीकडे धाव घेतली होती. मात्र, डीवायएसपी खांबे यांनी मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधून मंडप काढणार नसल्याचा शब्द दिल्यानंतर जरांगे पुन्हा उपचारासाठी दाखल झाले आहेत.

Nana Patole : ‘जरांगेंचे आरोप गंभीर, फडणवीसांचीच SIT चौकशी करा’; नाना पटोलेंची मागणी

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मला कापलं तरी मंडपला हात लावू देणार नाही. हा मराठ्यांचा, गरीबांचा न्यायाचा मंडप आहे तो कसा मंडप काढतो ते बघतोच मी. तुम्ही मराठ्यांना कमजोर समजायला लागलात दादागिरी करायला लागलात , असा गृहमंत्री असतो का? दादागिरी करुन आंदोलन मोडता का? मराठ्यांचे आमदारा हाताखाली धरतायं ज्यांना आम्ही मोठं केलंयं, या शब्दांत मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे.

जरांगेंनी काल जे काही केलं तो तमाशा होता, त्यामुळे समाजाची बदनामी; बारस्करांचा हल्लाबोल

राज्याचा गृहमंत्री असाच वागत आहे, तर त्याला मराठा बांधवांनी काय करावं, कारण त्या दिवशीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असाच वागला होता. अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळेच मी मुंबईकडे निघालो होतो. आता मंडप हलवू नका, पुन्हा राज्यात वातावरण बिघडू नका, फडणीसांना सांगा, मंडप मूर्ती सगळं तसंच पाहिजे हलवू नका, अशी विनंती मनोज जरांगे यांनी डिवायएसपी खांबे यांना करताच त्यांनी मंडप काढणार नाही होय मी सांगतो, असं आश्वासन दिलं आहे.

विरोधक धांदात खोटं बोलताहेत; ‘महानंद’च्या आरोपांवरुन अजितदादांचं स्पष्टीकरण

अटक झाल्यास कापूस फुटल्यासारखे मराठे आंदोलनाला बसतील…
आता सरकार माझी चौकशी करत आहेत. मला जर अटक झाली ना तर राज्यातील करोडो लोकं आंदोलनाला बसतील. कापूस जसा फुटतो तसं रस्त्यावर नूसते मराठेच बसलेले दिसतील. तुम्ही मराठ्यांना चॅलेंज करु नका शेवटचं सांगतो. मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा हेच लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, त्यांच्या अंगावर तुम्ही येऊ नका मला खरचटलं तरीही आता पाहिलं तुम्ही मी समाजाला किती जीव लावतो. या समाजासाठी मान कापायला तयार आहे मी. त्यांनी आमचे लोकं सोडून द्यावेत, व्यासपीठ मूर्ती अन् मंडपला हात लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी देणार नसल्याचा इशाराच मनोज जरांगे यांनी यावेळी दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=XuLEV9soiF8

follow us