राज्यातील ‘या’ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा सविस्तर

राज्यातील ‘या’ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा सविस्तर

मुंबई : शुक्रवारी नुकतच राज्याचं हिवाळी अधिवेशन समाप्त झालं. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 दरम्यान नागपूर येथे पार पडले. त्यानंतर आता राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून या अगोदर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांना आता कुठे बदली देण्यात आली आहे. जाणून घेऊ…

1. राजेश पाटिल – आयएएस, 2005, संचालक, सैनिक कल्याण, पुणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. अश्विन ए. मुदगल आयएएस, 2007, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई, म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. अजय अण्णासाहेब गुल्हाने, आयएएस, 2010 यांची नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांचा अतिरिक्त कार्यभार
4. दीपक सिंगला, आयएएस, 2012 यांची पीएमआरडीए पुणे येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. भाग्यश्री बानायत – आयएएस, : 2012 यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. डॉ. इंदुरानी जाखर, मुंबई आयएएस : 2016 यांची एमएव्हीआयएमच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या अगोदर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या पोलिस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये 30 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचाही समावेश होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube