तुळजापूर ड्रग्जचा मुद्दा गाजला; अग्रवालला अजून अटक का केली नाही? कैलास पाटील आक्रमक

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपी अतुल अग्रवालला अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही? असा थेट सवाल आमदार केैलास पाटील यांनी अधिवेशनात केलायं.

Kailas Patil

Tuljapur Drugs Case : तुळजापूर देवस्थान ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा आज हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) अखेरच्या दिवशीच चांगलाच गाजल्याचं चित्र पाहायला मिळालंय. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांनी घेरलंय. ड्रग्ज प्रकरणी आरोपींनी अतुल अग्रवाल नावाच्या व्यक्तीचं नाव सांगितलं असतानाही अद्याप अतुल अग्रवाल नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक का केली नाही? असा थेट सवाल उपस्थित करीत पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता राज्यभरात तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आलायं.

राजयकीय विरोध पण दुश्मन नव्हे; एकेकाळी भुजबळांसाठी जायंट किलर ठरलेल्या नांदगावकरांकडून भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस

आमदार कैलास पाटील सभागृहात बोलताना म्हणाले, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी मुख्य आरोपी अग्रवालला पोलिस अटक का करत नाहीत? तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हा संवेदनशील विषयावर बातम्या देणाऱ्या माध्यमांवर दबाव टाकला जात आहे. मागील अधिवेशनातही लक्षवेधी मांडली. तुळजापूरसारख्या छोट्या शहरात काही लोकांमुळे शहर बदनाम होतंय. आरोपीने सांगितलंय की, अतुल अंग्रवालकडून ड्रग्ज विकत घेतलं पण अजूनही त्याला अटक केली नाही हा विरोधाभास कसा? असा थेट सवाल आमदार पाटील यांनी केलायं.

मेस्सीच्या कार्यक्रमातील राड्यानंतर ममता बॅनर्नीजींचा माफीनामा अन् थेट चौकशीचे आदेश

या मुद्द्यावर बोलताना आमदार पंकज भोईर यांनी सडेतोडपणे उत्तर दिलंय. ते म्हणाले, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांकडून 38 जणांवर कारवाई करण्यात आलीयं. त्यापैकी 30 आरोपींना अटकही करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणी कसून तपास सुरु आहे. मात्र, तुळजापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी मुख्यमंत्र्यांकडे देवस्थानची बदनामी होत असल्याची तक्रार दिलीयं. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले असून चौकशीत सर्व काही समोर येणार असल्याचं भोयर यांनी स्पष्ट केलंय.

‘गुलामांनी प्रतिक्रिया द्यायची नसते, गांढूळाणे फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो’; उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र

तर दुसरीकडे आमदार राणा जगजितसिंह यांनीही या प्रकरणी आवाज उठवला असून तुळजापूरची नाहक बदनामी केली जात आहे. तुळजापूर देवस्थान महाराष्ट्राचं आराध्यदैवत असून या प्रकरणी पोलिस कारवाई करीत आहेत. मात्र, काही लोकं जाणूनबूजुन तुळजापूरची बदनामी करण्याच प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी कारवाई केलीयं, त्यामुळे आता शहराची बदनामी होऊ नये, अशी मागणी राणा जगजितसिंह यांनी सभागृहात केलीयं.

follow us