‘खरा निकाल लागलाच नाही, आता या प्रवृत्तीविरुद्ध…’; आंबेडकरांचे आमदार अपात्रता निकालावर भाष्य

  • Written By: Published:
‘खरा निकाल लागलाच नाही, आता या प्रवृत्तीविरुद्ध…’; आंबेडकरांचे आमदार अपात्रता निकालावर भाष्य

Prakash Ambedkar on Shiv Sena MLAs disqualification : गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून राज्यात चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shiv Sena MLAs disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल जाहीर केला. नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरवलेत. तसंच शिवसेना (Shivsena) ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच आहे, यावर शिक्कामोर्तब केलं. या निर्णयावर आता संमिश्र प्रतिक्रिया आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज फक्त औपचारीकता पूर्ण झाली, असं आंबेडकर म्हणाले.

‘ये तो होना ही था’….निकालावरुन जितेंद्र आव्हाडांनीही सत्ताधाऱ्यांना घेरलं… 

आज प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, कायदेशीरपणे बोलायचं झालं तर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिले होते. त्यामुळे साहजिकच अपात्रता ही केवळ औपचारिकता होती. नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयामुळे आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की खरा निकाल लागेल. मात्र, खरा निकाल लागला नाही, असं आंबेडकर म्हणाले.

हा एकाधिकारशाही, हुकूमशाहीचा पराभव’, आमदार पात्रतेच्या निकालानंतर CM शिंदेची प्रतिक्रिया 

नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानुसार दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरले आहेत. तब्बल आठ महिने चाललेल्या सुनावणीनंतर नार्वेकर यांनी एकाही आमदाराला अपात्र ठरवले नाही. मात्र शिंदे गटाला खरी शिवसेना अशी मान्यता देऊन देऊन ठाकरे गटाला धक्का दिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्यास परवानगी दिली त्याच दिवशी शिवसेनेचा (यूबीटी) पराभव झाला. आज फक्त औपचारिकता उरली गोचीय आम्हाला ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

या प्रवृत्तींविरुद्ध एकत्र लढू

निकाल काहीही लागला असला तरी या प्रवृत्तीविषयी आपणण मिळून लढू, असं उद्धव ठाकरे यांना आंबेडकर यांन आवाहन केलं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असं आंबेडकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube