राष्ट्रवादीलाही उद्धव ठाकरेच विधानपरिषदेत हवेत; सुप्रिया सुळे यांची ट्वीट करत थेट विनंती
उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील-सुळे
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, निवडणुकीची अधिसूचना जाहीर जारी झालीय. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहेत. परंतु महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. भाजपला सर्वाधिक पाच, तर शिवसेनेचे (शिंदे ) दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक उमेदवार निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून येऊ शकते. महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरेसेनेला जाणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच उमेदवार असा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) होत आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही अशीच मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंसाठी एक ट्वीट केलंय. महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये केलीय. उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच पाठिंबा देण्याची भूमिका महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाने घेतलेली आहे.
“घरात घुसून मारेन!”; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच संजय गायकवाडांचा जुना ‘ट्रॅक रेकॉर्ड’ चर्चेत!
महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच…
— Supriya Sule (@supriya_sule) April 23, 2026
ठाकरे सेनेमध्ये चुरस
उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे उमेदवार असल्यास ते बिनविरोध निवडून येऊ शकतात. उद्धव ठाकरे हे उमेदवार नसल्यास सेनेकडून उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच असणार आहे. शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्ता सुषमा अंधारे, माजी आमदार वैभव नाईक, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही इच्छुक आहेत. याती एकाचा नावावर शिक्कामोर्तब करताना उद्धव ठाकरे यांना कसरत करावी लागणार आहे.