भाजपचे ‘फेक नॅरेटिव्ह’ कॉंग्रेस खोडून काढणार, CM सुखविंदर सुख्खु अन् रेड्डी खोटारडेपणा उघडा पाडणार…

  • Written By: Published:
भाजपचे ‘फेक नॅरेटिव्ह’ कॉंग्रेस खोडून काढणार, CM सुखविंदर सुख्खु अन् रेड्डी खोटारडेपणा उघडा पाडणार…

 

मुंबई : भारतीय जनता पक्षाने (BJP) वृत्तपत्रात मोठ्या जाहिराती देऊन काँग्रेसशासित (Congress) कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत, असा खोटा प्रचार करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा कॉंग्रेसने केला. भाजपचे हे फेक नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी व महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खु (Sukhwinder Sukhkhu), तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा मुंबईत पत्रकार घेऊन भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडणार असल्याची माहिती आहे.

Video : जेवढा जोर लावायचा तेवढा लावा पण…; शाहंच्या निशाण्यावर पुन्हा पवार, थेट दिलं चॅलेंज 

भाजपकडून खोटा अपप्रचार
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे उद्या (शनिवार दि. ९ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. काँग्रेस पक्षाने काल गुरुवारी निवडणूक आयोगाकडे भाजप विरोधात तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस विरोधात अपप्रचार करण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न असून काँग्रेस पक्षाकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. गेल्या १० वर्षापासून केंद्रात आणि साडे सात वर्ष राज्यात सत्तेत असून सांगण्यासारखे काही काम केले नाही. कामाच्या नावावर मते मिळणार नाहीत, त्यामुळेच भाजपकडून खोटा अपप्रचार सुरू आहे, असं कॉंग्रेसने म्हटलं.

छगन भुजबळ असं काहीच बोलले नाहीत; पुस्तकातील दावे चर्चेत येताच अजितदादा उतरले मैदानात 

भ्रष्टाचार आणि कमिशखोरीतून मिळालेल्या शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी त्यासाठी सुरु आहे. पैशाच्या जोरावर महायुतीचा अपप्रचार सुरु आहे. काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगाणा व हिमाचल प्रदेश निवडणुकीत दिलेल्या गॅरंटीची अंमलबजावणी सुरु आहे. या तिन्ही राज्यातील कोट्यवधी लोकांना या गॅरंटीचा लाभ मिळत आहे असं कॉंग्रेसने म्हटलं.

दरम्यान, उद्या पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भाजपचा आरोपांना आणि अप्रचाराला प्रत्युत्तर देणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube