Video : जेवढा जोर लावायचा तेवढा लावा पण…; शाहंच्या निशाण्यावर पुन्हा पवार, थेट दिलं चॅलेंज

Video : जेवढा जोर लावायचा तेवढा लावा पण…; शाहंच्या निशाण्यावर पुन्हा पवार, थेट दिलं चॅलेंज

Amit Shah Challenges Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (Amit Shah) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली.  तसेच राज्यातील काही मुद्द्यांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले.

अमित शाह म्हणाले, मी महाविकास आघाडी आणि तुम्हा सगळ्यांना विचारण्यासाठी येथे आलोय की औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. पण आघाडीवाले याचा विरोध करत आहेत आणि बाळासाहेबांचे वारसदार म्हणवणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील त्याचा विरोध करत आहेत. पण आज मी सांगतोय पवार साहेब ऐका जितका जोर लावायचा असेल तितका लावा पण औरंगाबादचं नाव आता संभाजीनगरच राहणार आहे. याला कुणीच बदलू शकत नाही.

मविआच्या गाडीला ना चाक ना ब्रेक ड्रायव्हर सीटसाठीही वाद; पहिल्या प्रचारसभेत मोदींचा ‘प्रहार’

काश्मीरात पुन्हा ३७० नाहीच

जम्मू काश्मीरच्या विधानसभेत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्ससह काँग्रेसने एक ठराव केला. कलम ३७० पुन्हा लागू करा असा तो ठराव होता. पण आज मी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून सांगतोय की शरद पवार (Sharad Pawar) तुमच्या चार पिढ्या आल्या तरी आता कलम ३७० पुन्हा येणार नाही, असे अमित शहा यांनी ठणकावून सांगितलं.

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? शिराळ्यात अमित शहांनी भर सभेत दिले संकेत

मोदीजींनी संसदेत वक्फ बोर्डाशी संबंधित विधेयक आणलं. आता या विधेयकाचाही या लोकांनी विरोध सुरू केला आहे. आता कर्नाटकात वक्फ बोर्डाने अख्ख्या गावाला मंदिरांसह, शेतकऱ्यांच्या जमिनींसह वक्फची संपत्ती घोषित केलं. मी पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंना विचारतो की तुम्ही वक्फ बोर्डाचे समर्थन करताल की विरोध करताल पण ते उत्तर देणार नाही.

मी तुम्हाला सांगतो जर चुकूनही महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या नावावर करण्याचं कामही करतील. पण तुम्ही काळजी करू नका. केंद्रात तुम्ही लोकांनी नरेंद्र मोदींचं सरकार आणलंय. मी आज शिराळा वासियांना सांगून जातोय की जोपर्यंत नरेंद्र मोदींचं सरकार आहे या क्षेत्रातील मंदिरांच्या जमिनी आणि शेतकऱ्यांच्या जमिनींना आम्ही कुणालाही हात लावू देणार नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube