‘कधीतरी खरं बोलायला शिका…’; सुजय विखेंनी घेतला थोरातांचा खरपूस समाचार
अहिल्यानगर – निळवंडे होवू देत नाही असे अनेक आरोप विखे पाटील परिवारावर झाले. परंतु, भगवान के घर देर है, अंधेरा नही. निळवंड्यांचे पाणी मंत्री विखे पाटील यांनीच आणून दाखविले, कधीतरी खरं बोलायला शिका, अशा शब्दात डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी बाळासाहेब थोरातांवर (Balasaheb Thorat) हल्लाबोल केला.
अंकगणित नाही; 44 उमेदवार जाहीर केल्यानंतर आग्रहाखातर पाटलांनी जाहीर केला शेजारी बसलेला उमेदवार
संगमनेरमध्ये फक्त दडपशाही…
हिवरगाव पावसा येथे आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात बोलताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपध्दतीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, संगमनेर या तालुक्याची संस्कृती ही फक्त दडपशाही आणि गुंडगिरीमध्ये अडकलेली आहे. येथील विकास हा फक्त ठराविक कुटूंबासाठी आणि ठेकेदार पोसण्यासाठी सुरु आहे. युवा संवाद यात्रा काढता, पण तुमच्या सोबत युवा राहीला आहे का? असा थेट सवाल सुजय विखे पाटील यांनी केला.
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीतून युगेंद्र पवार तर, वळसेंच्या विरोधात निकम
ते आमदारही होणार नाहीत…
दडपशाहीची संस्कृती उखडून टाकण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. निर्धार करा. या तालुक्याचा यंदाचा आमदार हा महायुतीचाच करायचा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे आता आमदारही होवू शकणार नाही, अशा शब्दात सुजय विखे पाटील यांनी थोरातांवर निशाणा साधला.
ते म्हणाले, निळवंडे होवू देत नाही असे अनेक आरोप विखे पाटील परिवारावर झाले. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांना बदनाम केले गेले. परंतु, भगवान के घर देर है, अंधेरा नही. निळवंड्यांचे पाणी मंत्री विखे पाटील यांनीच आणून दाखविले. यासाठी जेष्ठ नेते पिचड साहेबांचेही मोठे सहकार्य मिळाले, त्यांचे योगदान कोणीही नाकारु शकत नाही. कधीतरी खरं बोलायला शिका, अशी टीका विखेंनी केली. प्लेक्स लावून स्वत:चा उदोउदो करुन घेणारी ही माणसं शेतक-याला पाणी देवू शकत नाही. आमच्या तालुक्यात या आम्ही स्वत:च्या खिशातून पैसे घालून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविले, असंही विखे म्हणाले.
ते म्हणाले, या तालुक्यात सभा घेतांना रोज नवीन काहीतरी बोलावे लागते. मात्र येथील जनता ४० वर्षे एकच भाषण कसे ऐकते अशी उपरोधीक टिका करुन, तालुका कुटूंब असल्याची खोटी सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न वर्षानुवर्षे सुरु असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
तालुक्यातील आमदारांनी जी गावे दत्तक घेतली, त्या गावांना एक रुपयांचा निधी त्यांनी कधी दिला नाही. आता त्यांच्याकडे दत्तक जावू नका. कारण त्यांच्या कुटूंबात जागा नाही, त्यांच्या कुटूंबात फक्त ठेकेदारांना संधी आहे. आता विखे पाटील परिवार तुमच्यासाठी समर्थ आहे. आमच्या गाडीत ठेकेदारांना नव्हे तर कार्यकर्त्यांना संधी आहे. अंगणवाडीच्या कामात सुध्दा पैसे खाणारे ठेकेदार यांनी निर्माण केले, हीच का तुमची संस्कती याचे उत्तर आता जनता मागत आहे, असंही विखे म्हणाले.
गायरान जमीनी हडपल्या…
या तालुक्यात फक्त संस्कृतीवर भाषणं सुरु होतात. मात्र आमची संस्कृती जमिनी हडपण्याची नाही. माजी महसूल मंत्र्यांनी गायरान जमीनी स्व:ताच्या संस्थांच्या नावावर करुन घेतल्या. मात्र महसूल मंत्री विखे पाटील यांनी साडे तीनशे कोटी रुपयांच्या जमिनी या अनेक गावांच्या विकासासाठी आणि औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी दिल्या. याकडे लक्ष वेधून एकदा संस्कृतीवर चर्चा कराच, तुमची संस्कृती फक्त ठेकेदार जीवंत ठेवण्यासाठी असल्याची टिका सुजय विखे पाटील यांनी केली.
विखे म्हणाले, तालुक्यात परिवर्तन करण्याची हीच संधी आहे. महायुती सरकारने अनेक योजना दिल्या आहेत, त्याचा लाभ सर्वांनाच मिळाला आहे. महायुतीच्या योजनांमध्ये गरीब, श्रीमंत असा भेद नाही. अंमलबजावणीमध्ये पक्षीय राजकारण नाही. राजहंस दुध संघाला सुध्दा दूध अनुदानापोटी १४ कोटी रुपये दिल्याचं विखे म्हणाले.