‘समोर कोणीही उभा असला तरी विजय वळसे पाटलांचाच’; लेक पूर्वा वळसेंना विश्वास
Purva Walse Patil : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) तर शरद पवार गटाकडून देवदत्त निकम (Devdutt Nikam) रिंगणात आहेत. आंबेगावमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील (Purva Walse Patil) यांनी विजय वळसे पाटलांचाच होणार असं ठासून सांगितलं.
पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आंबेगावातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम झाले : वळसे पाटील
पूर्वा वळसे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. त्या म्हणाल्या, माझे वडील सात टर्म आमदार आहेत, यंदा त्यांची आठवी टर्म असेल. त्याचं काम, चारित्र्य आणि स्वभाव लोकांना चांगलाच ठाऊक आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आमची मतदारसंघातील लोकांशी नाळ जोडलेली आहे. मागच्या 35 वर्षापासून आंबेगाव, शिरूरच्या जनतेने वळसे पाटलांचे काम माहित आहे. एकेकाळी मागास आणि दुष्काळी अशी तालुक्याची ओळख पुसण्याचं काम त्यांनी केलं, असं पूर्वा वळसे म्हणाल्या.
दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला मोठं केलंय, तालुक्याचा विकास केलाय ; विष्णू काका हिंगे
आज मतदारसंघात हरितक्रांती आली, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या. अनेक पदांवर काम करूनही वळसे पाटलांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांनी कधीही जाती-पातीचं राजकारण केलं नाही. कोणी त्यांच्याकडे काही काम घेऊन आलं तर त्यांनी कधीही याने मला मतदान केलं की नाही, याचा कुठलाच विचार न करता कित्येकांची काम केली. त्यामुळं समोर कोणीही उभा असला तरी विजय वळसे पाटलांचाच होणार, असा विश्वास पूर्वा वळसेंनी व्यक्त केला.
माझं आमदारकीचं स्वप्न नाही…
अजित पवार गटाकडून पूर्वी वळसेंना तिकीट मिळेल, अशी चर्चा होती. याविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझं आमदारकीचं कधीच स्वप्न नव्हतं. मी आमदारकी, खासदारकीसाठी कधीचं इच्छुक नव्हते. ना 2019 ला इच्छुक होते, ना 2024 ला. मी माझ्या वडिलांच्या कार्यात जेव्हा सक्रीय झाले, तेव्हापासून माझ्या नावाची चर्चा सुरू होती. मी माझ्या वडिलांचा 2019 च्या निवडणुकीला प्रचार केला. यंदाही त्यांचा प्रचार करतेय. पण, मी फक्त वळसे पाटलांची एक कार्यकर्ती आहे, असं पूर्वी वळसे म्हणाल्या.
वळसे पाटील कधीही कुणाबद्दल वाईट बोलत नाहीत. कोणी कितीही टीका केली तरी वळसे पाटलांकडून चुकीची शब्द जात नाही, असं म्हणत आपली बाजू जेव्हा जमेची असते, तेव्हा मुद्देसुदपणे बोललं पाहिजे. मात्र, काही लोकांच्या भूमिका जेव्हा स्पष्ट नसतात, तेव्हा वाटेल तशी टीका करतात, जे टीका करतात, ते त्यांचं कर्म आहे, असं म्हणत पूर्वा वळसेंनी रोहित पवारांवरही निशाणा साधला.
दरम्यान, सुप्रिया सुळे माझ्या मार्गदर्शिका आहेत. त्या मला आजही प्रिय आहेत, उद्याही प्रियच असतील, असं पूर्वा वळसे म्हणाल्या.