‘सामंतांना शह देण्यासाठी शिंदेंनी साळवींना सोबत घेतलं’; ठाकरे गटाचा मोठा दावा
![‘सामंतांना शह देण्यासाठी शिंदेंनी साळवींना सोबत घेतलं’; ठाकरे गटाचा मोठा दावा ‘सामंतांना शह देण्यासाठी शिंदेंनी साळवींना सोबत घेतलं’; ठाकरे गटाचा मोठा दावा](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Rajan-Salvi_V_jpg--1280x720-4g.webp)
Vinayak Raut On Rajan Salvi : शिंदे गटाकडून ठाकरे गट (UBT) फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलं. ठाकरे गटाचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आता ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनीही उपनेते पदाचा राजीनामा दिलाय. ते गुरुवारी दुपारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. यावर आता माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut ) यांनी भाष्य केलं.
संजय राऊत दलाल अन् शकुनी आहे; पवारांवरील टीकेनंतर संजय शिरसाटांचे टीकास्त्र
उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढलेली जवळीक पाहता त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी साळवींना सोबत घेतल्याचं राऊत म्हणाले.
राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. अखेर ते उद्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.याबाबत बोलताना विनायक राऊत म्हणाले, उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीक पाहता त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांना सोबत घेतलं. शिंदे गटाकडून राजन साळवींचा वापर करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय, असा टोलाही राऊत यांनी लगावला. राऊत पुढं म्हणाले, राजन साळवींची कीव करावीशी वाटते. विधानसभेच्या पराभवानंतर साळवी यांनी १०० बैठका घेतल्या आणि भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस आपल्याला विधान परिषदेवर घेणार असंही त्यांनी सांगितलं. मात्र, नंतर भाजपने त्यांच्यासाठी कायमची दारं बंद केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना साधी भेटही दिली नाही.
ठाकरेंच्या रॅलीत दहशतवादी चालतो पण पवारांनी शिंदेंचा सत्कार केलेला नाही; शिरसाटांचा निशाणा
राऊत म्हणाले, ज्या सामंत कुटुंबाच्या विरोधात साळवी आरोळी फोडत होते, त्यांचं पालकत्व राजन साळवी यांना स्वीकारावं लागणार आहे. हा नियतीने त्यांच्यावर घेतलेला सूड आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला.
विनायक राऊत म्हणाले की, राजन साळवी गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेत काम करत होते तेव्हा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. एखाद्याला बेईमानी आणि गद्दारी करायची झाली तर कोणावर तरी त्याला खापर फोडावं लागणार आणि त्यांनी ते खापर माझ्यावर फोडलं, असंही राऊत म्हणाले.
राजन साळवी यांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून पैसै घेतले, हे निलेशराणे यांनी एका वर्षापूर्वी जाहीरपणे सांगितलं. त्याच वेळी साळवींच्या निष्ठेचा बुरखा फाटला होता, अशी टीकाही राऊतांनी केली.