Ahmednagar : जगतापांविरोधात ठाकरेंचा ‘वाघ’ शड्डू ठोकणार? ओबीसी फॅक्टरवर भिस्त

  • Written By: Published:
Ahmednagar : जगतापांविरोधात ठाकरेंचा ‘वाघ’ शड्डू ठोकणार? ओबीसी फॅक्टरवर भिस्त

सहकाराचा जिल्हा असलेल्या अहमदनगरमध्ये (Ahmednagar) शिवसेना (Shivsena) रुजणे आणि वाढणे हे एक आश्चर्यच म्हणायला हवे. भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, (Balasaheb Thorat) बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, यशवंतराव गडाख असे दिग्गज असतानाही जिल्ह्याच शिवसेना वेगाने वाढली. अहमदनगर शहर तर शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. 25 वर्षे शिवसेनेचा आमदार, सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून येत असत. शिवसेनेच्या या वाढीसाठी धडाडीने प्रयत्न केले ते दिवंगत आमदार अनिल राठोड. राठोड हेच शहरातून 25 वर्षे आमदार राहिले.

पण याच अनिल राठोड यांना दोनदा पराभूत करण्याची किमया साधली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी. भाजप-शिवसेनेची युती तुटल्याचा शिवसेनेला मोठा फटका बसला. दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आणि युतीच्या मतांचे विभाजन झाले. याचा थेट फायदा जगतापांना झाला. भाजपच्याच मदतीने महापालिका हातात घेतली. 2019 मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले. वडीलही आमदार होतेच. एकूणच जगताप यांनी शहरावर एकहाती वर्चस्व तयार केले.

पण आता राष्ट्रवादीतीन फुटीनंतर राजकीय समीकरण बदलली आहेत. संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे येथे महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होणार आहे. पण दोन्ही आघाडीमधील सर्वच पक्ष या जागेवर दावा करत आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने शहर जागेसाठी आग्रही मागणी केली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला ही जागा सुटणार आणि कोण-कोणाविरुद्ध मैदानात उतरणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

याचबद्दल सविस्तर माहिती पाहू लेट्सअप मराठीच्या ‘ग्राऊंड झिरो’ या आपल्या स्पेशल सिरीजमध्ये

लेट्सअप मराठीने अहमदनगर शहराची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी चावडी चर्चा आयोजित केली होती. याचा व्हिडीओ तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलला पाहू शकता. त्याची लिंकही इथे दिली आहे.

यानंतर आता शहरात कोण कोण दावेदार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत… (Who will challenge NCP’s Sangram Jagtap in Ahmednagar assembly constituency)

महायुती व महाविकास आघाडीचे एक सूत्र ठरलेले आहे. ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला ती जागा. या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादीला मिळेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे जगताप यांनी तिसऱ्या टर्मसाठी तयारी सुरु केली आहे. पण त्यांच्यासाठी लढाई वाटते तितकी सोपी नाही. शिवसेनेच्या काळात ही जागा भाजपला मिळू शकली नाही. शहरी मतदारसंघ, येथील जातीय समीकरणाचा विचार करता हा मतदारसंघ भाजपला मिळावा, असे अनेकदा मागणी झाली. लोकसभेला विखे पराभूत झाले असले तरी नगर शहरातून त्यांना तीस हजारांहून अधिक मतांचे मताधिक्क्य आहे. यात भाजपचाही वाटा आहे, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. भाजपचे जुने नेते आणि विधानसभेला दोनवेळा नशिब अजमाविणारे शहराध्यक्ष अभय आगरकर हेही इच्छुक आहेत. तर माजी शहराध्यक्ष भैया गंधेही उमेदवारी मागत आहे.

अमृता पवारांचं चॅलेंज, माणिकराव शिंदेंही मैदानात… भुजबळांसाठी ‘येवला’ अवघड?

इकडे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना तिन्ही पक्षांकडून या जागेवर दावेदारी ठोकली जात आहे. दक्षिण जिल्ह्यात सहापैकी काँग्रेसला एकही जागा मिळत नाही. त्यामुळे ही जागा शहराध्यक्ष किरण काळे हे मागत आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर ही या जागेसाठी दावेदारी सांगत आहेत. ताकदीचा विचार केल्यास शिवसेना हे प्रबळ दावेदार आहेत. त्यात नगर महानगरपालिकेचे पहिले महापौर राहिलेले भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड असे चौघांचे नावे चर्चेत आहेत. फुलसौंदर आणि बोराटे हे माळी समाजाचे आहे. या समाजाचे एकगठ्ठा मतदार आहेत. त्यामुळे ऐनवेळी मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत या मतदारसंघात होऊ शकते.

हा मतदारसंघ राज्यातील इतर मतदारसंघापेक्षा वेगळा आहे. कारण या मतदारसंघात सर्व जातीचे एकगठ्ठा मतदार आहेत. त्यामुळे एका जातीच्या फॅक्टरवर निवडणूक जिंकता येत नाही. सर्वच जातीच्या मतांची बेरीज करणे आवश्यक ठरते. पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरात मुस्लिम, दलित मते महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे लंकेंना नगरमधून चांगले मते मिळाली हे आकडेवारीवरून दिसून येते. सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा  असा संघर्ष आपण पाहिला आहे. त्यामुळे नगरमध्ये शिवसेना माळी समाजाचा उमेदवार देऊन ओबीसी समाज आपल्याकडे खेचू शकतात.

Ground Zero : शरद पवारांचा डोळा फडणवीसांच्या मोहऱ्यावर… मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंचे नाव?

लंके व विखेंची भूमिका :

खासदार निलेश लंके यांना नगर शहरातून 75 हजारहून अधिक मते मिळाली. त्यात ठाकरे सेनेचे स्थानिक नेते हे लंकेंसाठी जीवाचे रान करत मदत करत होते. खासदार झाल्यावर नगरच्या प्रश्नावर लंके हे प्रश्न उचलून धरत आहेत. ही जागा शिवसेनेला मिळाल्यास लोकसभेची परतफेड म्हणून लंके यांनाही शिवसेनेला सर्वप्रकारची मदत करावीच लागणार आहे. तर विखे यांना मानणारेही कार्यकर्ते आहे. त्यांनाही जगतापांसाठी लक्ष घालावे लागणार आहे. जगताप आणि विखे यांची मैत्रीही जगजाहीर आहे. हे सर्वच फॅक्टर पाहता नगरचा सामना यंदा पुन्हा अटातटीचा होईल हे मात्र नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube