कोरेगाव पार्कातील जमीन घोटाळा प्रकरणाला वेगळं वळण; पार्थ पवारांबाबत पुणे CP नी काय सांगितलं?
Pune Police Commissioner यांनी पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणाबाबत माहिती दिली.
Accused in land scam arrested; What exactly did Pune Police Commissioner say about Parth Pawar : पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत आले आहेत. याप्रकरणामध्ये नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. यावर आता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी या गुन्ह्याबाबत बोलताना म्हटलं की,यामध्ये तहसीलदारांसह इतर आठ आरोपी आहेत.
धनंजय मुंडेंनी हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप
काय म्हणाले पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार?
मुंढवा वादग्रस्त जमी खरेदी प्रकरणी जी तक्रार दाखल झाली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पुढील तपास हा ईडब्ल्यूकडे वर्ग करण्यात आला आहे. तर पार्थ पवारांबाबत टीपण्णी करणे आताच संयुक्तिक नाही. कारण हा गुन्हा मिळालेल्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये जी नावं आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर सखोल तपास सुरू झालेला आहे. या व्यवहाराचे सर्व कागदपत्र तपासल्यानंतर तपासाची पुढची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. यामध्ये तहसीलदारांसह इतर आठ आरोपी आहेत.अशी माहिती याबाबत अमितेस कुमार यांनी दिली आहे.
https://x.com/LetsUppMarathi/status/1986700695463206943
नगर-मनमाड रस्त्यावरून विखे-लंकेंमध्ये जुंपली! काम चार वर्षात पूर्ण करणार… लंकेचे विखेंना प्रत्युत्तर
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे. या कंपनीने 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी केली.तसेच या खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी करत या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाबाबत पोलीस आयुक्तांनी दिली मोठी अपडेट#parthpawar #ajitpawar #Pune #landscam @AjitPawarSpeaks @andharesushama @anjali_damania @VijayKumbhar62 @Dev_Fadnavis @CPPuneCity @supriya_sule @PawarSpeaks @RRPSpeaks @iambadasdanve pic.twitter.com/CBzhBAJNWs
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 7, 2025
