शरद पवार गटाकडून अजित पवारांना पुन्हा धक्का, बाबाजानी दुर्रानींनंतर दुसरा आमदार गळाला?

शरद पवार गटाकडून अजित पवारांना पुन्हा धक्का, बाबाजानी दुर्रानींनंतर दुसरा आमदार गळाला?

Chetan Tupe on Sharad Pawar Stage : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून जोरदार धक्के देण सुरू आहे.  नुकताच अजित पवार गटाती आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तर आता पुण्यातल्या एका कार्यक्रमाला अजित पवाराच्या गटाच्या आमदाराने उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

माजी आमदाराने सोडली अजितदादांची साथ; दुर्रानी आजच करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पुण्यातील शरद पवारांच्या कार्यक्रमात आज अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हेही उपस्थित होते. शरद पवारांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच चेतन तुपे पवारांसोबत व्यासपीठावर दिसून आले आहेत. सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने गोल्डन ज्युबली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होतं. यावेळी शरद पवार अन् चेतन तुपे एकाच व्यासपीठावर दिसले.

जयंत पाटलांच्या वक्तव्याने मोठी खळबळ; म्हणाले, धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी

सातारा जिल्हा मित्र मंडळाचा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील वानवडी येथे पार पडला. माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होते. विधानसभेआधी राजकारणात अनेक कोलांटउड्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चेतन तुपे यांनी शरद पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने या घटनेला वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube