कोयत्याने सपासप वार करुन घेतला नरडीचा घोट, भर कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची हत्या…

कोयत्याने सपासप वार करुन घेतला नरडीचा घोट, भर कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची हत्या…

Baramati Murder News : विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याच गुन्हेगारीच लोन आता ग्रामीण भागातही पसरत असल्याचं दिसून येत आहे. कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नरड्याचा घोट घेतलायं. कॉलेज सुरु असतानाच विद्यार्थ्यांसमोरच त्याने सपासप वार करुन विद्यार्थ्याची हत्या केल्याचा प्रकार बारामतीतील चतुरचंद कॉलेजमध्ये (Chaturchand College Murder Case) घडलायं. हत्येमागचं कारण अद्याप आलं समोर आलेलं नाही. या घटनेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडालीयं.

देशी गायी ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित; वाचा, मंत्रिमंडळ बैठकीतील 38 धडाकेबाज निर्णय

नेमकं काय घडलं?
दोन्ही विद्यार्थी पुण्यातील बारामतीमधील एकाच कॉलेजात शिकत आहेत. कॉलेजच्या मुख्य आवारात आज एक विद्यार्थी आला त्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्याच्या कोयत्याचा घाव एवढा वर्मी होता, या घावाने कोयता विद्यार्थ्याच्या नरड्यातच अडकला होता. ही घटना कॉलेजमधील विद्यार्थ्यांसमोरच घडली. यावेळी एका विद्यार्थीनीलाही दुखापत झाल्याचं समोर आलंय.


आरक्षण संपवण्यासाठी चार मुख्य पक्ष एकत्र; आंबेडकरांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं

या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून पोस्टमध्ये सुळे म्हणाल्या, बारामती येथील एका महाविद्यालयात एका तरुणाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा व्यवस्थेचा आलेख दिवसेंदिवस ढासळत चाललेला असून गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही.

दिवसाढवळ्या कुणीही तलवार, कोयता, गावठी पिस्तुल घेऊन येतो आणि खून करतो अशी स्थिती आहे. गृहमंत्री महोदयांच्या अपयशामुळे महाराष्ट्रात सुरु झालेले हे गुंडाराज राज्याला अनेक वर्षे मागे घेऊन गेले, ही वस्तुस्थिती असल्याचं सुळेंनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, बारामतीसारख्या शांत शहरात एवढी मोठी घटना घडल्याने सर्वसामान्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. तर पुण्यातली कोयता गॅंग कायमच चर्चेत असून या गॅंगचे लोन आता ग्रामीण भागातही उमटायला लागले असल्याचं पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube